Wednesday, September 10, 2025

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रूग्णालयात जावून घेतली मनोज जरांगे यांची भेट

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रूग्णालयात जावून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेवून तब्येतीची विचारपूस केली. यावेळी शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा झाली.

मंत्री विखे पाटील यांनी उपचार करणार्‍या डॉक्टरांकडून जरांगे यांच्या तब्येतीची आणि सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे उपस्थित होते. शासनाने घेतलेल्या निणर्याच्या संदर्भात मंत्री विखे पाटील आणि जरांगे यांच्यात चर्चा झाली.

शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना मराठवाड्याची मने जिंकण्याची संधी सरकारला असल्याची भावना जरांगे यांनी बोलून दाखवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे निर्णय होवू शकला.त्यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी कायम सकारात्मकता दर्शवली. गावपातळीवर प्रमाणपत्र देण्यासाठी नेमलेल्या समितीच्या कार्यपध्दती ठरविण्याबाबत जिल्हाधिकरी यांना बोलावून बैठक घेणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles