Sunday, March 15, 2026

29 वर्षे वेदना सहन केल्या, पण आता…मुरलीधर मोहोळ रुग्णालयात…..

पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी विमानवाहू व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या पायाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तब्बल २९ वर्षांपूर्वी कुस्तीच्या आखाड्यात झालेली जुनी दुखापत पुन्हा बळावल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर मुरलीधर मोहोळ यांना आता किमान एक महिना सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

२९ वर्षांपूर्वी कुस्ती सोडण्याचे ठरले होते कारण
राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ हे एक निष्णात कुस्तीगीर होते. २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या एका दुखापतीमुळे त्यांचे कुस्तीचे स्वप्न अर्धवट राहिले. त्यामुळे त्यांना कुस्ती कायमची सोडावी लागली होती. इतकी वर्षे त्यांनी या वेदनांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा त्रास प्रचंड वाढला होता. अखेर वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केल्या भावना
क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती !
२९ वर्षांपूर्वी… कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली… इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. त्यामुळे किमान एक महिन्याकरता ही विश्रांती !
खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे… आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय?
दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles