नगर कल्याण महामार्गावर सीना नदीवरील नव्या पुलाचे काम प्रगतीपथावर; रस्ता 31 मार्चपर्यंत बंद वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

अहिल्यानगर – कल्याण महामार्गावर नेप्ती नाका येथील सीना नदीवरील नव्या पुलाचे काम प्रगतीपथावर. १६ ते ३१ मार्च दरम्यान हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार. वाहतूक अन्य मार्गानी वळविली.

अहिल्यानगर शहरातील कल्याण अहिल्यानगर – पाथर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील सीना नदीवरील
मोठ्या पुलाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर असून पुलाच्या Super Structure साठी Girder Launching चे
काम करण्यात येणार आहे. सदर काम दि. १६ मार्च २०२६ ते दि. ३१ मार्च २०२६ या कालावधीत करण्यात येणार
आहे.
सदर कामासाठी पुलाजवळ मोठ्या आकाराचे गर्डर तयार करण्यात आले असून ते बसविण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेन व टूलेरचा वापर करण्यात येणार आहे. संबंधित रस्ता हा अत्यंत वर्दळीचा असल्यामुळे
कामकाजादरम्यान अपघात होण्याची किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी अहिल्यानगर – दौंड मार्गावरील
कायनेटिक चौक ते अरणगाव बायपास या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने दि. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ०८.०० वा. पासून ते दि. ३१ मार्च २०२६ रोजी रात्री ०८.०० वा.
पर्यंत सीना नदी पुलाजवळील वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्यात येणार आहे.
१) नेप्ती नाका कडून कल्याण बायपासकडे जाणारी वाहतूक :
नेप्ती नाका सक्कर चौक- कायनेटिक चौक रंगोली हॉटेल – लिंक रोड मार्गे इच्छित स्थळी जावी.

तसेच लहान वाहनांसाठी पर्यायी मार्ग : नेप्ती नाका काटवन खंडोबा रोड मार्गे जावे.
२) कल्याण बायपासकडून नेप्ती नाक्याकडे येणारी वाहतूक :
कल्याण बायपास – लिंक रोड – रंगोली हॉटेल (केडगाव) मार्गे इच्छित स्थळी जावी.
नागरिकांनी व वाहनचालकांनी वरील पर्यायी मार्गांचा वापर करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे तसेच
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
मा. संपादक,
वाहतुक
शहर व
*
शाखा
अहिल्यानगर
*
मिलेग
हवाई
पोलीस निरीक्षक
शहर वाहतूक नियंत्रण शाखा
अहिल्यानगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles