राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावरुन प्रफुल्ल पटेल यांना हटवले…पार्थ व जय पवार यांच्यावर मोठी जबाबदारी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना अखेर पदावरून हटविण्यात आले आहे. १० मार्च रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या पत्रात या पटेल आणि सुनील तटकरे दोघांच्याही नावासमोर त्यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने राजकीय वादळ उठले होते. परंतु, २९ एप्रिलला पवार यांनी नवे पत्र देत पटेल यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्षपद काढून घेतले आहे.

निवढणुक आयोगाला दिलेल्या नव्या पत्रात सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष तर शिवाजीराव गर्जे हे कोषाध्यक्ष म्हणून नमूद करण्यात आले आहे. तर, राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून पार्थ आणि जय पवार यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

२९ एप्रिल रोजी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुधारित पदाधिकाऱ्यांची यादी पाठविण्यात येत असल्याचे म्हटले आहे. ही यादी अंतिम असेल असेही या पत्रात म्हटले आहे. यात राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष, शिवाजीरावर गर्जे हे कोषाध्यक्ष पार्थ पवार अणि सुबोध मोहिते हे सरचिटणीस तर जय पवार राष्ट्रीय सचिव अशी पदे असतील. अविनाश आदिक, सना मलिक, धीरज शर्मा, संजय प्रजापती, राणा रणवीर सिंग, डॉ. रमन प्रीत सिंग, धनंजय शर्मा आणि डॉ. अभिषेक बोके यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles