स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी सर्वेच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु असताना काँग्रेसचा मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली समोर आली आहे. काँग्रेस पक्षातील बडा नेत्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या गटाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश झाला आहे. राहुल पाटील, राजेश पाटील आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे आगामी निवडणुकींपूर्वी कोल्हापुरात काँग्रेसला जोरदार धक्का असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढला आहे.
मागील निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक फेरबदल झाले. माझे वडील पी.एन.पाटील आणि माझ्या मातोश्री गेल्या. पवार साहेबांनी, पवार कुटुंबीयांनी धीर दिला. पण काहींना आमची आठवण देखील झाली नाही, असे म्हणत राहुल पाटील यांनी काँग्रेस पक्षातील नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली.
पक्षप्रवेशादरम्यान राहुल पाटील यांनी ‘आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमचे सगळे कार्यकर्ते, आता राष्ट्रवादीचे शिलेदार असणार. निवडणुकीनंतर आमच्या मनात खदखद होती. अशा काळात अजित दादा तुम्ही आम्हाला हात दिला. तुम्ही खंबीर साथ दिल्याने आजचा हा कार्यक्रम संपला आहे. ज्या पद्धतीने पी एन पाटील यांनी एका विशिष्ट विचारसरणीने काम केले, एका घराण्यावर निष्ठा ठेवली, त्याच पद्धतीने आम्ही आपल्यासोबत प्रामाणिकपणे राहणार. इथून पुढे माझ्यासोबत आणि माझ्या कार्यकर्त्यांसोबत दादा तुम्ही नेहमी सोबत रहा’, असे वक्तव्य केले.


