पत्नी सोशल मीडियावर खूप वेळ घालवते; तिला संपवलं अन् बनाव रचला, मृतदेह नग्न अवस्थेत फेकला…

पत्नी सोशल मीडियावर जास्त असते याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात उघड झाला आहे. तब्बल एक महिन्यानंतर पोलिसांना उलगडा करण्यात येईल याप्रकरणी फोटोग्राफर असणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. खुनाचा हेतू कळू नये मृतदेहाची ओळख पटू नये. ओळख पटलीच तर महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला असे पोलिसांना वाटावे, यासाठी पतीनेच पत्नीचा खून करून नग्न अवस्थेत तिचा मृतदेह टाकला होता पतीने पत्नीचा हा खून केवळ संशयावरून केल्याचे समोर आलं आहे. यातील मृत पत्नीचे नाव ऐश्वर्या हरी सरवदे असून ती शहरातील इस बावी परिसरात राहत होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरसाळे(ता.पंढरपूर) येथील रस्त्याच्या पुलाजवळ १२ मार्च रोजी एका महिलेचे मृतदेह नग्न अवस्थेत कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता. याबाबत पोलिसांना तत्काळ काही धागे दोरे सापडले नाही. या बेवारस मृतदेहाच्या संदर्भात पोलिसांनी जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा एक हरवल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली.
ऐश्वर्या हरी सरवदे (वय २९) या राहत्या घरातून ९ मार्च २०२६ रोजी पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिचे पती हरी हिरालाल सरवदे (वय ३५) याने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात १२ मार्च २०२६ रोजी दिली होती. उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत डगळे यांनी या घटनेची प्राथमिक चौकशी केली असता त्यावेळी त्यांना या घटनेत थोडा संशय आला. त्यामुळे तपासासाठी पथक लावून अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. यावेळी पती कडून मिळालेल्या माहितीमध्ये विसंगती जाणवली. त्यानुसार पोलिसांनी अधिक गती देऊन तपास केला असता ऐश्वर्या यांचा खून पती हरी सरवदे याने केल्याचे पुढे आल्याचे प्रशांत डगळे यांनी सांगितले.

९ मार्च रोजी घटना घडण्याच्या दिवशी ऐश्वर्याचा मोबाईल एक तास बंद होता. या दरम्यान हरी याने ऐश्वर्याचा मोबाईल सुरू करून वॉटर पार्क येथे जात असल्याचा स्टेट्स ठेवला. हरी याने ऐश्वर्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृत्यू देह एक दिवस घरातच ठेवला होता. ऐश्वर्याचा मृत्यू झाला हे मुलांना समजू नये यासाठी मुलांना घराबाहेर घेऊन जात होता. एक दिवस ऐश्वर्याचा मृतदेह घरातच ठेवला. नंतर त्याने एका ठिकाणी पुरून टाकला. त्यानंतर त्याने मृतदेह पोत्यात भरून गुरसाळे ( ता. पंढरपूर) येथे नेऊन टाकला. तसेच तो सतत येऊन मृतदेहाची टेहळणी करत असे. या घटनेत त्याने कोणाची मदत घेतली का याचा तपास कारणाचे काम सुरू असल्याचे प्रशांत डगळे यांनी सांगितले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles