महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ

र्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट फटका भारतीय ग्राहकांना बसला आहे. शनिवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. आज पेट्रोल ८७ पैशांनी तर डिझेल ९१ पैशांनी महागले आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या १० दिवसांतील ही तिसरी मोठी दरवाढ आहे.

या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून, पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या आणखी एका धक्क्याला .सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. आधी १६ मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची मोठी वाढ केली होती. त्यानंतर १९ मे रोजी सर्व प्रमुख महानगरांमध्ये पुन्हा ९० पैशांची दरवाढ झाली. आज (शनिवारी) झालेल्या ताज्या वाढीसह गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेल तब्बल ५ रुपयांनी महागले आहे.
पेट्रोल- 108.45
डिझेल-95.02

Parbhani Petrol and Diesel rates

पेट्रोल- 110.45 पैसे
डिझेल- 97.02

Kolhapur Petrol and Diesel rates

पेट्रोल- 109.30
डिझेल- 95.89

Bhandara Petrol and Diesel rates

109.60 (पेट्रोल नवा दर)

96.18 (डिझेल नवा दर)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles