Saturday, February 21, 2026

राष्ट्रवादीची एक्सपायरी डेट जवळ आलीय…२०२९ पर्यंत हा पक्ष…

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पिंपरी- चिंचवडमधील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना थेट इशाराच दिला आहे. काका–पुतण्यावर जोरदार हल्लाबोल करत पडळकरांनी आक्रमक भाषेत टीका केली. “मी दहा वर्षांपासून पवारांच्या नादी लागलो आहे, माझं काहीही करू शकले नाहीत. मग महेश लांडगे यांचं काय करणार?” असा सवाल करत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. भाजपच्या नादी लागल्यास भर चौकात नंगा करेल, असा इशाराही पडळकरांनी दिला.

पडळकर म्हणाले, “ही महापालिका सोन्याच अंडं देणारी कोंबडी आहे. विरोधकांना ही कोंबडी कापायची आहे, म्हणूनच ते वारंवार पिंपरी-चिंचवडमध्ये येत आहेत आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर टीका करत आहेत. महेश लांडगे हे वाघ आहेत. पंजा मारला, तर कार्यक्रम होईल,” असा इशाराही पडळकर यांनी दिला.

अजित पवारांची छाती फाडली तर १०–१५ कारखाने ढापलेले निघतील. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक सातबारे त्यांच्या नावावर निघतील. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येतील. त्यामुळे महेश लांडगे यांच्या नादी लागू नये. महेश लांडगे हे पैलवान आहेत. कुठल्या क्षणी कुठला डाव टाकतील, सांगता येत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत ते म्हणाले, “एक्सपायरी डेट जवळ आलेल्या राष्ट्रवादीच्या नादी लागू नका. २०२९ पर्यंत पक्ष टिकेल की नाही याची शंका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच अजित पवारांना सन्मानाची खुर्ची मिळाली असून ती नीट सांभाळा, उगाच भाजपच्या नादी लागू नका,” असा टोला पडळकरांनी लगावला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles