Friday, March 13, 2026

राहुरी येथील पोलिसावर भररस्त्यात प्राणघातक हल्ला, नगरमधील १५ जणांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर – कंटेनर चालकाला मारहाण करण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला मज्जाव करणाऱ्या पोलिस हवालदारावर १५ जणांच्या टोळक्याने लोखंडी गज, लाकडी दांडक्यांनी प्राणघातक हल्ला करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (८ मार्च) रात्री ११.४५ च्या सुमारास राहुरी येथील ग्रीन हॉटेल चौक येथे घडली. या टोळक्याने मारहाण करताना पोलिसाचे कपडेही फाडले आहेत. या प्रकरणी बुरूडगाव (ता.नगर) येथील १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो.हे.कॉ. विकास रंगनाथ वैराळ असे या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. रविवारी (८ मार्च) रात्री खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे, महेश निमसे (सर्व रा. बुरूडगाव, ता.नगर) व त्यांच्या समवेत इतर ११ अनोळखी इसम हे सर्वजण महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ (क्र. एम एच १६ सीटी ७०) व आणखी एक विटकरी रंगाची स्विप्ट कारमधील इसम हे राहुरी येथे नगर मनमाड रस्त्याने जात असताना त्यांच्या कारला कंटेनरचा (क्रं. एनएल ०१ एजे १३०८) धक्का लागला म्हणुन त्यावरील चालकाला लोखंडी गज व काठीने मारहाण करण्याच्या तयारीत असतांना व सदरची घटना फिर्यादीचे बीट हद्दीत घडत असल्याने फिर्यादीने त्यांची व्हिडीओ शुटींग केल्याचा मनात राग धरुन या आरोपींनी फिर्यादी वैराळ यांना लोखंडी फायटरने, लोखंडी गजाने, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन फिर्यादीचा गळा दाबुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच इतर अनोळखी आरोपी यांनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने, लोखंडी गजाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आरोपी महेश निमसे याने फिर्यादीचा मोबाईल हॅण्डसेट जबरीने चोरुन नेला. या घटने नंतर जखमी झालेल्याहवालदार वैराळ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेत असताना दिलेल्या जबाबा वरून राहुरी पोलिसांनी या १५ आरोपींच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न सरकारी कामात अडथळा अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे या तिघांना पोलिसांनी अटक करत स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles