राजुर, ता.अकोले येथे पेट्रोल व डिझेल बेकायदा साठवनुक व विक्री ठिकाणावर छापा, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/ गणेश लबडे, पोना/ राहुल डोके, पोना/ शामसुंदर जाधव, पोकॉ/ मनोज साखरे, चा.पोहेकॉ/ भांड यांचे पथक तयार करुन, सदर पथकास अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.
पोलीस निरीक्षक, किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीवरुन, उपरोक्त प्रमाणे पथकांस खात्रीकरने करीता रवाना केले. गुप्त बातमीप्रमाणे नमुद पथक वारंघुशी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर येथे जावुन, गुप्त बातमी नुसार इसम नामे पांडुरंग लक्ष्मण सदगीर, वय 40 वर्षे यांचेकडे चौकशी केली असता, त्यांचेे घरासमोर प्लास्टिक ड्रम मध्ये अवैद्य रित्या विक्री करीता ठवेलेले पेट्रोल व डिझेल ठेवले असल्याचे मिळुन आले. आरोपी नामे नामे 1) पांडुरंग लक्ष्मण सदगीर, वय 40 वर्षे, वारंघुशी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर यांस अवैद्य रित्या विनापरवाना बेकायदा, इतरांचे जिवितास धोखा निर्माण होईल याची जाणीव असतांना वरील वर्णंनाचे पेट्रोल व डिझेल विक्री करण्याकरीता साठा करुन आपले कब्जात बाळगतांना मिळुन आला, अधिक विचारणा केली असता, सदरचे पेट्रोल व डिझेल हे 2) लक्षमण ऊर्फ पांडु तानाजी घोंगडे, रा. पाडळी, ता. इगतपुरी, जि. नाशिक (नजरेआड) यांचेकडुन कमी भावामध्ये विकत घेत असल्याचे सांगितले. आरोपी 1) यांचे ताब्यातुन पेट्रोल व डिझेलने भरलेले 06 प्लॅस्टिक ड्रम आणि महिंद्रा बोलेरो कपंनीची मालवाहु पिकअप असा एकुण 6,41,370/- रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपी नामे 1) पांडुरंग लक्ष्मण सदगीर, वय 40 वर्षे, वारंघुशी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर आणि 2) लक्षमण ऊर्फ पांडु तानाजी घोंगडे, रा. पाडळी, ता. इगतपुरी, जि. नाशिक (फरार) यांचेविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/ 2293, राहुल कचरु डोके, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द गु.र.नं. 340/2025 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 287, 3(5) आणि अत्यावश्यक वस्तु कायदा, 1955 चे कलम 3, 7, 6 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयात एकुण 6,41,370/- रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला. गुन्हयातील आरोपी 1) आणि जप्त मुद्देमाल राजुर पो.स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास राजुर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.