Wednesday, October 29, 2025

मेगा भरती; भूकरमापकांच्या ९०३ पदांची भरती! आजपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज

भूमी अभिलेख विभागातील गट क संवर्गातील भूकरमापकांची ९०३ रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी १ ते २४ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

राज्यात भूकरमापक संवर्गातील एकूण १ हजार १६० पदे रिक्त आहेत. त्यापैकी ९०३ पदे सरळसेवा या पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे विभागातील ८३ पदे, कोकण (मुंबई) विभागातील २५९, नाशिक विभागातील १२४, छत्रपती संभाजीनगर विभागातील २१०, अमरावती विभागातील ११७ आणि नागपूर विभागातील ११० पदांचा समावेश आहे.उमेदवारांचे अर्ज https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ आणि https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. या भरतीसाठी येत्या १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.

मान्यताप्राप्त महाविद्यालयातील किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविकाधारक (डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरींग) किंवा माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्रधारक (आयटीआय सर्व्हेअर) या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.

यासंदर्भात घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे विभागनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी राज्य शासनाकडून जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून विभागनिहाय अंतिम निवड यादी आणि प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागाचे संचालक डाॅ. सुहास दिवसे यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles