Thursday, February 19, 2026

अजित पवारांच्या श्रद्धांजलीचे बॅनर कर्जतमधून काढले, रोहित पवार संतापले; म्हणाले,

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. अजित पवार यांच्या पार्थिवाला २९ जानेवारीला साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. दरम्यान अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारे फ्लेक्स अनेक शहरांमध्ये लावण्यात आले आहेत. अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरात अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने काढून टाकले. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

माझ्या मतदारसंघात कर्जत शहरात नागरिकांनी अत्यंत दुःखी भावनेने आणि जड अंतःकरणाने लावलेले मा. अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने अत्यंत वाईट पद्धतीने काढून टाकले आहेत. ही बाब अत्यंत संतापजनक आहे. अजितदादांचा अवमान करणारी, नागरिकांच्या भावनांचा अनादर करणारी आणि त्यांच्या दुःखावर मीठ चोळणारी आहे. याबाबत चौकशी करून सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, ही विनंती असल्याचे रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

रोहित पवार हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. अजित पवार यांच्या जाण्याने झालेलं दुःखही त्यांनी पोस्टच्या स्वरुपात सोशल मीडियावर मांडलं होतं. रोहित पवार हे कर्जत मतदारसंघातून निवडून आले आहेत. रोहित पवार दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर जेव्हा अजित पवार यांना भेटले होते तेव्हाच्या त्यांच्या भेटीचा किस्साही चर्चेत आला होता. दरम्यान अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रोहित पवार यांनी हळहळ व्यक्त केली होती. आपल्या शब्दांना सोशल मीडियावरच्या पोस्टमधून वाट करुन दिली होती. अजित पवारांना आदरांजली वाहणारे बॅनर त्यांच्याच कर्जत या मतदारसंघातून काढून टाकण्यात आले. त्यामुळे आता रोहित पवार संतापले आहेत. त्यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

२८ जानेवारीची सकाळ महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरली असंच म्हणता येईल. कारण याच दिवशी अजित पवारांचं विमान मुंबईहून बारामतीच्या दिशेने निघालं होतं बारामतीच्या विमानतळावर पोहचण्याआधी या विमानाने दोन घिरट्या घातल्या आणि त्यानंतर हे विमान अपघातग्रस्त झालं. विमानाचं क्रॅश लँडिंग झाल्याने अजित पवार आणि त्यांच्यासह असलेले त्यांचे अंगरक्षक, दोन वैमानिक आणि फ्लाईट अटेंडंट असे सगळे या अपघातात ठार झाले. पवार कुटुंबावर आणि महाराष्ट्रावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ जानेवारीला अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि बारामतीसह सं

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles