उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवार यांची थेट मोठी प्रतिक्रिया, म्हणाले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. विमानातील एकही व्यक्ती जिवंत राहू शकला नाही. या विमान अपघाताबद्दल संशय देखील व्यक्त केला जात आहे. अजित पवार आज आपल्यात नाहीत याचा विश्वास अजूनही लोकांना होत नाही. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विलिगीकरणाबाबत विविध दावे केली जात आहेत. शरद पवार यांनी स्वत: म्हटले की, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पक्ष विलिगीकरणाबाबत चर्चा सुरू होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्यांनी सांगितले की, अशी कोणतीही चर्चा झाली नाही किंवा अजित पवार यांनी याबाबत आमच्यासोबत चर्चा केली नाही.अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांना जाऊन काही तास झाले असताच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अनेकांनी भूवया उंचावल्या. दरम्यानच पवार कुटुंबातील वादही थेट पुढे आला. सुनेत्रा पवार यांनी आपल्याला कोणतीही कल्पना दिली नाही किंवा त्यांचा शपथविधी आहे हे देखील आपल्याला माहिती नसल्याने त्यांनी म्हटले.

आता नुकताच शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. शरद पवार यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. यादरम्यान सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल बोलतानाही शरद पवार दिसले. शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, मला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल काहीच बोलायचे नाही. शरद पवार यांनी यावर भाष्य करणे टाळल्याचे बघायला मिळाले.

भारत आणि चीन सीमेवरीव सध्याच्या परिस्थितीवर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. यासोबतच त्यांनी म्हटले की, या मुद्द्याची संसदेत चर्चा होणे गरजेचे होते. राहुल गांधी यांनी चीन आणि भारत सीमेबद्दल संसदेत भाष्य केले, ज्यानंतर मोठा गदारोळ बघायला मिळाला. आता याबद्दलच बोलताना शरद पवार हे दिसत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles