Tuesday, March 24, 2026

माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन झगडे; सचिवपदी अमोल ठाणगे

माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन झगडे; सचिवपदी अमोल ठाणगे
समन्वय व संघर्षाच्या भूमिकेतून शिक्षक हितासाठी लढण्याचा निर्धार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेची समन्वय बैठक व वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. ही सभा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या शिक्षक शिक्षकेतर भवन येथे आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनेच्या कार्याला पाठिंबा दर्शविला.
सभेत शिक्षक संघटनेच्या वैचारिक पायाभूत भूमिकेबद्दल माहिती देण्यात आली. शिक्षक संघटनेला टीडीएफच्या वैचारिक परंपरेचा वारसा लाभलेला असून, ही पार्श्‍वभूमी जपली गेल्यासच खऱ्या अर्थाने सक्षम संघटन उभे राहू शकते, असे मत ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव ढाळे यांनी व्यक्त केले.
संघटनेने आजवर सातत्याने संघर्षाची भूमिका घेत शिक्षकांच्या व माध्यमिक शिक्षणाच्या प्रश्‍नांसाठी अविरत काम केले आहे, असे प्रतिपादन चांगदेव कडू यांनी केले. यावेळी राजेंद्र लांडे व आप्पासाहेब शिंदे यांनी समन्वयाची भूमिका मांडत, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शिक्षक हितासाठी लढा दिल्यासच संघटना टिकाऊ धरणार, असे मत व्यक्त केले.
बैठकीचे अध्यक्ष शिरीष टेकाडे यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. त्यानुसार सचिन झगडे (श्रीगोंदा) यांची अध्यक्षपदी, तर अमोल ठाणगे (पारनेर) यांची सचिवपदी निवड करण्यात आली. खजिनदारपदी अशोक सोनवणे (नेवासा) यांची निवड झाली.
उपाध्यक्षपदी भालचंद्र देशमुख (कर्जत), सचिन फटांगरे (संगमनेर), प्रसाद शिंदे (श्रीरामपूर), सोमनाथ सुंबे (नगर) व सचिन जाधव (कोपरगाव) यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी देविदास पालवे (पाथर्डी), राज जाधव (राहुरी), रावसाहेब शेळके (अकोले) व मोहन यादव (जामखेड) यांची निवड झाली. हिशोब तपासणीसाठी संतोष आडकिते (शेवगाव) व देविदास सातपुते (राहता) यांची नियुक्ती करण्यात आली.
निवड समितीतील शिवाजीराव ढाळे, चांगदेव कडू, राजेंद्र लांडे, मच्छिंद्र लगड, आप्पासाहेब शिंदे व शिरीष टेकाडे यांनी एकमताने ही कार्यकारिणी निवडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र खेडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन रमजान हवालदार यांनी केले.

“ज्येष्ठ मार्गदर्शक व नवीन कार्यकारिणी यांच्या समन्वयातून संघटनेची वैचारिक बांधणी अधिक मजबूत करत शैक्षणिक व्यवस्थेतील सर्व घटकांच्या समस्या सोडवण्यावर भर देणार,” तसेच संघटनेच्या माध्यमातून शिक्षक हितासाठी प्रभावीपणे काम केले जाणार. -सचिन झगडे (जिल्हाध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles