राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी कही दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य केलं होतं, दिवाळीची सर्व खरेदी ही फक्त हिंदू दुकानदारांकडूनच करा, सर्व नफा हा हिंदू व्यावसायिकांना मिळाला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं, यावरून वातावरण चांगलंच तापलं, वातावरण तापलेलं असतानाच आता पुन्हा एकदा संग्राम जगताप यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हिंदू महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत सर्व आरोपी जिहादीच सापडतात, असं त्यांनी म्हटलं आहे. संग्राम जगताप यांच्या या नव्या वक्तव्यामुळे आता आणखी एका वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे अत्याचाराच्या शंभर केसेसमध्ये शंभर महिला हिंदू सापडतात आणि सर्व आरोपी जिहादी असतात, आपल्यातीलच काही मानसिक खतना झालेले लोक आरोपींना पाठीशी घालतात असं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, या मोर्चामध्ये बोलताना जगताप यांनी हे वक्तव्य केलं आहे. जे हिरवे साप फणा काढतील त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे. या लोकांना वेळोवेळी माफ करण्याचे पाप आमच्यासकट अनेकांनी केले, मात्र आता प्रायश्चित करण्याची वेळ आली आहे. असं देखील आमदार जगताप यांनी यावेळी म्हटलं.पुढे बोलताना ते म्हणाले की, याला जी सुरुवात झाली ती बेकरी सुरू झाल्यापासून, हळूहळू लहान मुले, भगिनी तेथे बेकरीमधील पदार्थ घेण्यासाठी जातात. महिलांना पदार्थ देण्याच्या बहाण्याने त्यांचे मोबाईल नंबर घेतले जातात. घारगाव मधील महिला अत्याचाराची घटना घडली. वृत्तपत्रात महिलेचे नाव , जात – धर्म दिली जात नाही. सर्वात जास्त अत्याचार हे हिंदू समाजातील महिलांवर होतात आणि त्यातील आरोपी एका विशिष्ठ समाजाचे असतात. घारगावच्या घटनेतील एक सहआरोपी आपल्या समाजातील आहे, पन तो त्या मानसिकतेचा नाही. प्रशासनाने अनाधिकृत मस्जिदी 15 दिवसात काढून घ्याव्यात, त्यासाठी आता सातत्याने पाठपुरावा करत राहावं लागणार आहे, पठार भागात अचानक ही लोक वाढायला लागली आहेत, असंही यावेळी जगताप यांनी म्हटलं आहे.
संग्राम जगताप यांचं खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले ?हिंदू महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत सर्व आरोपी ….
- Advertisement -


