राज्य कर निरीक्षकपदी सौरभ नरवडे
अहिल्यानगर, दि. १८ ः महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील वर्ग दोनच्या राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत टाकळी खातगाव (ता.नगर) येथील सौरभ एकनाथ नरवडे उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात ८८ वा क्रमांक मिळवून हे यश संपादन केले आहे. यापूर्वी पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेतही यश मिळविले होते.
सौरभ नरवडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर माध्यमिक शिक्षण हनुमान विद्यालय टाकळी खातगाव येथे झाले. त्यानंतर मॅकेनिक इंजिनिअर ही पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. यापूर्वी पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षेत यश मिळविले होते. शहरातील सिद्धीबाग शॉपिंग सेंटर येथील शिवम इलेक्ट्रीकल्सचे संचालक एकनाथ (बाळासाहेब) नरवडे यांचे मुलगा तर लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय नरवडे यांचे ते पुतणे आहेत.
राज्य कर निरीक्षकपदी नगर तालुक्यातील सौरभ नरवडे उत्तीर्ण
- Advertisement -


