Sunday, February 22, 2026

शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे प्रकृतीच्या कारणास्तव त्रस्त होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना आज सकाळी अचानक अस्वस्थता आणि थकवा जाणवू लागला. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांना सलाईन लावण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शरद पवार यांना काहीसा अशक्तपणा जाणवत आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना सलाईन लावली जाईल, अशी माहिती आहे. अशक्तपणा वगळता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार हे अनेक दिवस बारामतीमध्ये होते. त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या भेटीगाठी घेऊन पवार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान, अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या छातीत कंजेशन झाल्यामुळे पवारांना बारामतीवरुन पुण्याला आणण्यात आले होते. शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. तेव्हा शरद पवारांना अचानक त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवू लागला, त्यानंतर डॉक्टरांचं एक पथक घरी येऊन तपासणी करून गेले. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते पाच दिवस रुबी रुग्णालयात होते. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून शरद पवार हे पुण्यातील निवासस्थानी होते. मात्र, आता त्यांना पुन्हा एकदा अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles