श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेण्यात आल्या.या प्रक्रियेत सहभागी झालो.यावेळी जिल्हाप्रमुख अनिलशेठ शिंदे,दिलीपराव सातपुते सचिनभाऊ जाधव,माजी नगराध्यक्ष शुभांगीताई पोटे,मनोहर दादा पोटे,तालुकाप्रमुख नंदू ताटे,राजूभाऊ शेटे,अजीत दळवी,आदींच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व मुलाखती संपन्न झाल्या.
शिवसेनेकडून उमेदवारी करण्यासाठी या ठिकाणी इच्छुकांनी भाऊगर्दी केली. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राजकीय संधी मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.राज्यातील जनतेने शिंदे साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा विश्वास आहे.हे सर्व वातावरण पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला राज्यात अभूतपूर्व यश मिळेल हे नक्की
नगर जिल्ह्यात शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे ॲक्शन मोडवर… म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश
- Advertisement -


