उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाकडून अहिल्यानगरचे संपर्क मंत्री म्हणून राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याऩतर सामंत यांनी गुरुवारी अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा केला.या दौऱ्यात सामंत यांनी संगमनेरचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयास भेट देऊन वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले.
तसेच शिर्डी येथे कोपरगाव,राहता तालुक्याची आढावा बैठक घेतली.नंतर श्रीरामपूर व नेवासा येथेही मंत्री सामंत यांनी शिवसेनेच्या बैठका घेऊन उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. .
मंत्री उदय सामंत यांनी अहिल्यानगर जिल्ह्याची शिवसेना कार्यकारणी बरखास्त केली असून विद्यमान जिल्हाप्रमुखांना प्रभारी म्हणून काम पाहण्याचे आदेश दिले आहेत.येत्या महिनाभरात परिपूर्ण व सक्षम कार्यकारणी पुन्हा निवडली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.नगर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे थंडावलेले काम पाहता सामंत यांनी घेतलेल्या निर्णयाचे पक्षाचे नेते संजीव भोर यांनी व्यक्तिशः स्वागत केले आहे.
या दौऱ्यात आ.अमोल खताळ, मा.खा.सदाशिवराव लोखंडे, मा.आ भाऊसाहेब कांबळे,मा.आ.भाणुदास मुरकुटे,नितीन औताडे,कमलाकर कोते,सागरभैया बेग, युवा सेना संपर्कप्रमुख सिद्धेश अभंगे, श्रीमती सुरेखा गव्हाणे, शुभम वाघ,विमल पुंडे,आदी प्रमुख नेते,पदाधिकारी उपस्थित होते.


