Tuesday, February 24, 2026

गायिकेचे अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य….ठाकरेंच्या शिवसेनेने केला निषेध

गायिका अंजली भारती यांनी राज्यातील गुन्हेगारी आणि महिलांवरील बलात्काराच्या घटनांबद्दल बोलताना अमृता फडणवीस यांच्याबद्दल टिप्पणी केली. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांच्याविषयी अत्यंत वाईट भाषा वापरली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती.

आता उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही अमृता फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर, अंबादास दानवे, संजय राऊत या सर्व नेत्यांनी अमृता फडणवीस यांच्याविषयीचे वक्तव्य अयोग्य असल्याचे सांगत या प्रकाराच निषेध केला.

सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल गायिका अंजली भारती यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडीकून निषेध करत असल्याचे ट्विट ठाकरे गटाच्या मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केले. संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनीही अमृता फडणवीस यांच्याविषयीचे वक्तव्य योग्य नसल्याचे म्हटले.

गायिका अंजली भारती यांनी भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि शिंदे सेनेचे नेते आक्रमक झाले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles