Thursday, February 19, 2026

Video… लग्नात पाहुण्यांचे स्वागत चक्क सिगारेट, पानमसाला देवून

सध्या सोशल मीडियावर असं एक लग्न व्हायरल होत आहे, जिथे पाहुण्यांना स्टार्टर्समध्ये पानमसाला, गुटखा, सिगारेट आणि बीडी दिली जात आहे. होय, विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चकित व्हाल.

व्हिडीओ ca_vanshika_curates या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. काही नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे लग्न हरियाणातील गढवाल भागात झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. व्हिडीओमध्ये लग्नात पाहुण्यांना चक्क सिगारेट, बीडी आणि पानमसाल्याची पाकिटं दिली जात असल्याचं दिसून येत आहे. शहरी भागातील लोकांना ही गोष्ट थोडी विचित्र वाटत असली तरी ग्रामीण भागात मात्र ही अगदी सामान्य बाब असल्याचं म्हटलं जात आहे.


व्हिडीओ आतापर्यंत ८ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणत आहे की नव्या करप्रणालीमुळे जुना स्टॉक लग्नात संपवला जातोय, तर कोणी म्हणत आहे की लग्नात खूपच जास्त खर्च केला गेला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles