भिंगार शहरात घरात घुसलेल्या बिबट्याचा धूमाकूळ: चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाच्या पथकाने केले जेरबंद….व्हिडीओ

अहिल्यानगर – भिंगार परिसरात सोमवारी सकाळी बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. वनविभाग आणि पोलिसांनी चार तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितपणे पकडल्याने पुढील अनर्थ टळला. सकाळची वेळ कुणी नुकतंच डोळ्यावरची झापडं उघडली होती, कुणी आपल्या कामाला निघालं, रोजचा दिनक्रम सुरू होतो तोच परिसरात खळबळ उडाली. नागरिकांची झोप उडाली, आतापर्यंत ज्याच्याबद्दल ऐकत होतो तोच समोर उभा होता. लोक त्याला पाहण्यासाठी आडोसा पकडत होते तर तो भरवस्तीतून पळत होता. त्यामुळे सकाळी सकाळी एकच धावपळ उडाली. बिबट्या आला रे बिबट्या आला. लोकांच्या काळजात धस्स झालं. काहींनी दारं लावून घेतली. कुणी पटापट सामाजिक कार्यकर्त्यांना फोन फिरवले.
सामाजिक कार्यकर्त्यांनी वन विभाग आणि पोलिसांना भरवस्तीत बिबट्या घुसल्याची माहिती दिली. अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार परिसरात सकाळपासून बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. त्याला पाहायचंही होतं पण हल्ला केला तर… या भीतीपोटी सगळे घाबरून होते. अखेर पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी आले तेव्हा जीवात जीव आला.

वडारवाडी, नागरदेवळे भागात बिबट्याचा वावर दिसून आल्यानंतर पोलिस आणि वनविभागाला तातडीने पाचारण करण्यात आलं, चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बंद पडलेल्या घरात अडकलेल्या या बिबट्याला यशस्वीपणे पकडण्यात आलं आहे. भर नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याने भिंगार परिसरात एकच खळबळ उडाली. घरात अडकलेल्या या बिबट्याला यशस्वीपणे पकडण्यात आलं आहे. बिबट्या हनुमान मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस आणि नगर तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.सकाळपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान नागरिकांनीही सतर्कता दाखवत वनविभाग प्रशासनाला माहिती दिली. भिंगार परिसरात पहिल्यांदाच नागरी वस्तीत बिबट्या आढळल्याने नागरिक भयभीत झाले होते. अखेर बंद घरात अडकलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने भूल इंजेक्शन देत सुरक्षितपणे ताब्यात घेतलं. सध्या बिबट्या पूर्णपणे सुरक्षित आहे. अचानक बिबट्या दिसल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं. प्रशासनाने वेळीच कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles