राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अकाली निधन झाले. या भीषण दुर्घटनेनंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी फडणवीसांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठवण देखील काढली.
अर्थसंकल्प सादर करताना देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प आपण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित करत असल्याचे जाहीर केले. अजित पवार यांच्या स्मारकाची देखील घोषणा केली. दरम्यान यानंतर अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. “आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक आणि प्रगतिशील असा अर्थसंकल्प आहे. प्रादेशिक संतुलित विकास, शाश्वत प्रगती, सर्वसमावेशकता आणि सुशासन या चार प्रमुख आधारस्तंभांवर राज्याचा विकास साधण्याचाअजित पवार यांच्या स्मारकाची घोषणा तसेच त्यांच्या नावे पुरस्कार सुरू करणे ही त्यांना वाहिलेली श्रद्धांजली असल्याची भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे. “राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेल्या विकासाभिमुख आणि प्रगत विचारांशी सुसंगत अशी दिशा या अर्थसंकल्पात पाहायला मिळते. विशेषतः हा अर्थसंकल्प आदरणीय दादांना समर्पित करण्यात आल्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार व्यक्त करते. दादांच्या स्मरणार्थ उचित स्मारक उभारण्याची तसेच त्यांच्या नावाने ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ सुरू करण्याची घोषणा ही त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे.”
“कृषी क्षेत्राला बळकटी देणे, पायाभूत सुविधांचा वेगाने विस्तार करणे, पर्यटन, उद्योग आणि सेवा क्षेत्राला चालना देऊन रोजगारनिर्मिती वाढवणे यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधांसाठी २० टक्क्यांनी वाढ केलेली तरतूद राज्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती देईल. तसेच दादांच्या संवेदनशील विचारांनुसार दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एक टक्का निधी राखून ठेवण्याचा निर्णयही अत्यंत महत्त्वाचा आहे,” असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
अर्थसंकल्पात महिलांच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणा यावरही सुनेत्रा पवारांनी भाष्य केले आहे. “महिलांच्या सक्षमीकरणाला दिलेले विशेष प्राधान्यही उल्लेखनीय आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी तरतुदी, एकल महिलांसाठी धोरण आणि ‘लखपती दीदी’ उपक्रमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत. तसेच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनेही भरीव तरतूद करण्यात आली आहे, ही बाब भविष्यातील आधुनिक शेतीसाठी महत्त्वाची ठरेल,” असे त्या म्हणाल्या.
स्पष्ट दृष्टिकोन या अर्थसंकल्पातून दिसून येतो.”
मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांना समर्पित; सुनेत्रा पवार पोस्ट करत म्हणाल्या…
- Advertisement -


