जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेखा महारनूर व व्हा.चेअरमन पदी श्रीकांत देशमाने यांची निवड
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीमती सुरेखा बबन महारनूर व व्हा.चेअरमनपदी श्रीकांत गोपीनाथ देशमाने यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळची विशेष सभा दि.१८ जुलै रोजी संस्थेच्या कार्यालयात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अध्यासी अधिकारी किरण आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत चेअरमन पदासाठी श्रीमती सुरेखा महारनूर यांच्या नावाची सूचना संचालिका श्रीमती ज्योती पवार यांनी मांडली. सदर सूचनेस मावळत्या व्हाईस चेअरमन मनिषा साळवे यांनी अनुमोदन दिले. व्हा.चेअरमन पदासाठी श्रीकांत देशमाने यांच्या नावाची सूचना संचालक अर्जुन मंडलिक यांनी मांडली.सदर सूचनेस संचालक भाऊसाहेब चांदणे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकाऱ्यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नूतन चेअरमन सुरेखा महारनूर म्हणाल्या की जय श्री गणेश पॅनलने निवडणुकीच्या वेळी सभासदांना दिलेल्या आश्वासनाची १०० टक्के पूर्तता करण्याचे काम हे संचालक मंडळ करत आहे. संस्थेचे आर्थिक हित व सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून सहकारी संचालक व सभासदांच्या सहकार्याने विविध योजना राबविण्यात येतील. संस्थेचा लौकिक या पुढील काळात अधिक वाढविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील असेही त्या म्हणाल्या. व्हा.चेअरमन श्रीकांत देशमाने यांनी सर्व सहकारी संचालकांचे आभार मानून सभासदांच्या हिताचे निर्णय घेवू असे सांगितले.
सदर प्रसंगी संस्थेचे संचालक संजय कडूस, प्रशांत मोरे, विक्रम ससे, अरुण जोर्वेकर, विलास शेळके, राजू दिघे, दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, कल्याण मुटकुळे , सुधीर खेडकर, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, व्यवस्थापक राजेंद्र पवार, संस्थेचे सभासद दत्तात्रय होलम, अक्षय मेहेत्रे आदी उपस्थित होते.


