प्राथमिक शिक्षक बँकेत नोकर भरती व सभासदांच्या ठेवीवर्ग करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मनसुबा हाणून पाडू सभासदांच्या ठेवी अन्य ठिकाणी वर्ग करण्यासाठी अनेक वर्षापासून सत्ताधारी संचालक मंडळाने या ना त्या मार्गाने सुरू केला आहे परंतु कायम ठेवीमधून एकही रुपया अन्यथा जाऊ देणार नाही प्रसंगी त्यासाठी आंदोलन करण्याची तयारी असल्याचे शिक्षक समितीचे राज्य नेते संजय धामणे व जिल्हाध्यक्ष श्री.सिताराम सावंत यांनी सांगितले आहे यापूर्वी विकास मंडळासाठी सभासदांच्या ठेवी वर्ग करण्यासाठी अनेक वेळेस संचालक मंडळाने सर्वसाधारण सभेमध्ये ठराव पास करण्याचा प्रयत्न केला परंतु आजपर्यंत तसे न करता आल्याने भावनिक मुद्दा पुढे करून पुन्हा तोच प्रयत्न करू नये स्टाफिंग पॅटर्न करणे ही कायदा नियमाने बंधनकारक जरी असले तरी बँकेने नोकर भरती करू नये माहिती तंत्रज्ञानाची सर्व अत्याधुनिक साधने उपलब्ध असताना कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्रयत्न संचालकांत मंडळाचा असून बँकेवर याचा प्रचंड ताण पडणार आहे त्याचप्रमाणे सुरक्षारक्षकांसाठी सभासदांचे अवास्तव पैसे खर्च होतात यावर संचालक गंभीर आहेत काय?असा सवाल शिक्षण समितीचे सर्वश्री प्रल्हाद साळुंके,सुखदेव मोहीते,विजय महामुनी, दत्ता जाधव, संभाजी औटी, दत्ता गरुड, संजय किर्तने, संतोष डमाळे, बि.के. बनकर, अनिल,अष्टेकर, सुभाष धामणे,ऋषी गोरे,दादा अकोलकर, मिलिंद पोटे, रावसाहेब दरेकर,दत्ता उगले,महादेव शिर्के,वसंत शिंदे,दस्तगीर शेख,अशोक मुठे, गोरक्ष लोहरे, सुनिल घाडगे,अमोल जाधव,श्रीकांत साळवे,खैरनार,भाऊसाहेब जठार ,बाळासाहेब काशिद,बाळासाहेब भांगरे, सुनील लोंढे, गणेश कुलांगे, विजय कांडेकर, महेश देवतरसे, पांडुरंग पटारे,जालिंदर खाकाळ, विकास घोगरे,अण्णासाहेब आंधळे,महादेव आव्हाड,बाळासाहेब कासार,विलास गोरे, बबलू काळोखे, संदीप झरेकर, राजू झरेकर, शिवाजी काकडे जयप्रकाश साठे आदी शिक्षक समितीचे मान्यवर उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षक बँकेची सभा वादळी होणार! नोकर भरती व सभासदांच्या ठेवीवर्ग करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मनसुबा हाणून पाडणार
- Advertisement -


