जामखेड येथील कलाकेंद्राची तोडफोड करुन, दहशत करणारे आरोपी
1 अग्निशस्त्र (गावठी कट्टा) व 03 जिवंत काडतुसासह जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, जामखेड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 548/2025 भारतीय न्याय संहिता कलम 333,324(4)(5),189(2)191(2)(3),190सह अर्म अॅक्ट 4/25 सह फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम 1932 चे कलम 7 प्रमाणे दाखल झाला असता, सदर गुन्हयातील आरोपीची माहिती काढुन, गुन्हा उघडकीस आणणेबाबत मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले. त्यानुसार पोनि किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/ सुरेश चंद्रकांत माळी, पोहेकॉ/ दिपक भास्कर घाटकर, पोहेकॉ/ हृदय गौतम घोडके, पोहेकॉ/ लक्ष्मण चिंधु खोकले, पोहेकॉॅ/ फुरकान अब्दुल मुजीब शेख, पोना/ श्यामसुंदर अंकुश जाधव, पोकॉ/ प्रकाश नवनाथ मांडगे, पोकॉ/ सागर अशोक ससाणे, पोकॉ/ रोहीत अंबादास यमुल, पोकॉ/ भागवान बाळासाहेब थोरात, पोकॉ/ सतिष पोपट भवर, पोकॉ/ विशाल अण्णासाहेब तनपुरे, पोकॉ/ प्रशांत राम राठोड, मपोकॉ/ सोनल भागवत, चा.पोहेकॉ/ अर्जुन बडे यांचे दोन विशेष पथके तयार करुन, सदर पथकास सुचना व मार्गदर्शन करुन, पथके रवाना करण्यात आलेली होती.
नमुद पथकांनी गोपनिय माहिती व व्यावसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढुन, सदरचा गुन्हा अक्षय किशोर बोरुडे रा. तिसगांव ता.पाथर्डी याने त्याचे साथीदाराचे मदतीने केला आहे, अशी माहिती मिळाल्याने आरोपी नामे 1) अक्षय किशोर बोरुडे, वय 29 वर्षे, रा. मिरीरोड, तिसगांव, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर याचा शोध घेवुन त्यास गुन्हयाचे तपास कामी ताब्यात घेण्यात आले, त्यास गुन्हाबाबत विचारपुस करता, त्याने नमुद गुन्हा हा त्याचे साथीदार नामे 2) शहनवाज अन्वर खान, वय 30 वर्षे, रा. इंदीरानगर, तिसगांव, ता पाथर्डी, जि. अहिल्यानगर 3) जयसिंग दादापाटील लोंढे, वय 25 वर्षे रा. आडगाव, ता.पाथर्डी, जि. अहिल्यानगर ,4) अविनाश भास्कर शिंदे, वय 29 वर्षे, रा तिसगांव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर 5) गणेश सचिन शिंदे, वय 19 वर्षे, रा तुळजापुर पेठ, तिसगांव, ता. पाथर्डी, जि.अहिल्यानगर 6) ऋषिकेश यौसेफ गरुड, वय 18 वर्षे, रा तिसगांव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर 7) अनिकेत ऊर्फ बाळा नितिन कदम, वय 25 वर्षे, रा एम आय डी सी रोड, आष्टी, ता. आष्टी, जि.बीड 8) दिपक यौसेफ गरुड, रा तिसगांव, ता. पाथर्डी (फरार) 9) शिवम भारत आठरे, रा. पारेवाडी, ता. पाथर्डी (फरार) 10) किशोर शिवाजी जाधव, रा. तिसगांव, ता पाथर्डी (फरार) 11) अक्षय राजेंद्र जायभाय, रा पाथर्डी ता. पाथर्डी (फरार) 12) रोहीत दिलीप खंदारे, रा तिसगांव ता पाथर्डी जि. अहिल्यानगर (फरार) 13) आशिष हरीभाऊ साळवे रा तिसगांव ता. पाथर्डी (फरार) 14) संतोष लोंढे, पुर्ण नाव माहित नाही, रा आडगाव, ता.पाथर्डी (फरार) 15) अमोल महाडीक, पुर्ण नाव माहिती नाही, रा. पारेवाडी, ता पाथर्डी (फरार) 16) अभी मते, पुर्ण नाव माहित नाही, रा नेवासा, ता नेवासा (फरार) 17) अभी मते याचा मित्र, नाव माहित नाही (फरार) यांच्यासह 18) सचिन मधुकर लोखंडे, रा.आष्टी, ता.आष्टी जि. बीड (फरार) याचे सांगण्यावरुन, आम्ही 1) ते 17) रेणुका कलाकेंद्र, जामखेड येथे जावुन, तेथील लोंकाना जबर मारहाण करुन, कलाकेंद्राची तोडफोड करुन, दहशत निर्माण केली असल्याचे सांगितले.
तसेच आरोपी नामे 7) अनिकेत ऊर्फ बाळा नितिन कदम, वय 25 वर्षे, रा एम आय डी सी रोड, आष्टी, ता आष्टी, जि. बीड याचा शोध घेत असतांना, तो विना नंबरच्या स्कॉडा गाडी मध्ये कर्जत-जामखेड रोडने पाटोदा गावचे शिवारात गावठी कट्टयासह मिळुन आला. अशा प्रकारे नमुद गुन्हयातील आरोपी ताब्यात घेवुन, आरोपींकडुन 01 अग्नीशस्त्र (गावठी कट्टा), 03 जिवंत काडतुस, पांढरे रंगाची स्कॉडा कंपनीची गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण मिळुन रु. 6,53,000/- मुद्देमाल मिळुन आला.
ताब्यातील आरोपी नामे 1) अक्षय किशोर बोरुडे, वय 29 वर्षे, रा. मिरीरोड, तिसगांव, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर 2) शहनवाज अन्वर खान, वय 30 वर्षे, रा. इंदीरानगर, तिसगांव, ता पाथर्डी, जि. अहिल्यानगर 3) जयसिंग दादापाटील लोंढे, वय 25 वर्षे रा. आडगाव, ता.पाथर्डी, जि. अहिल्यानगर ,4) अविनाश भास्कर शिंदे, वय 29 वर्षे, रा तिसगांव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर 5) गणेश सचिन शिंदे, वय 19 वर्षे, रा तुळजापुर पेठ, तिसगांव, ता. पाथर्डी, जि.अहिल्यानगर 6) ऋषिकेश यौसेफ गरुड, वय 18 वर्षे, रा तिसगांव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर 7) अनिकेत ऊर्फ बाळा नितिन कदम, वय 25 वर्षे, रा एम आय डी सी रोड, आष्टी, ता. आष्टी, जि.बीड आणि गुन्हयात एकूण 06,53,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जामखेड पो.ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


