मनपा प्रशासनाचा भोंगळा कारभार. आमदार निधीतून बनवलेला रस्ता कुठलीही परवानगी न घेता पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खोदला.
मनपा प्रशासनाने रस्ता बनवून देण्याची मागणी- विजय गव्हाळे.
नगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन भेवरी चाळ गवळीवाडा येथे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून सहा महिन्यापूर्वी संपूर्ण रस्ता कॉंक्रिटीकरण केला तेव्हा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग व इतर विभागाने जमिनीखालचे कामे केलेली होती व आता पूर्ण झालेल्या रस्ता अचानक पणे कुठलीही परवानगी न घेता रस्ता खोदण्यात आला या अशा मनपा प्रशासनाच्या भोंगळ्या कारभारामुळे रस्त्याचे विद्रूपीकरण होत आहे. याला थांबवण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्यात यावी व रस्ते होण्यापूर्वीच कामे पूर्ण करण्यात यावी.
चौकट.
शहरांमध्ये सध्या आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून शहरांमध्ये विकास होत आहे व हे रस्ते पूर्ण तत्वावर झाले की मनपा प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभाग हा रस्ता खोदून पाईपलाईनचे काम करते मात्र या रस्त्याचे विद्रूपीकरण होऊन मोठ्या खड्ड्यात रूपांतर होते यामध्ये कोणतीही दुर्घटना घडते त्यामुळे रस्ता होण्यापूर्वी मनपा प्रशासनाने कामे पूर्ण करावी व जिथे रस्ता खोदण्यात येईल तेथे रस्ता बनवून देण्याची मागणी माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी केली आहे.
नगर मनपा प्रशासनाचा भोंगळा कारभार……आमदार निधीतून बनवलेला रस्ता खोदला
- Advertisement -


