Wednesday, October 29, 2025

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके पाऊस, वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावी

मुंबई, : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र, 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित असून किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे.

सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते, जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles