Wednesday, November 12, 2025

उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर नियुक्ती, संतोष देशमुख हत्याप्रकरणाची केस आता कोण लढणार? निकम म्हणाले….

जेष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. लोकसभा निवणुकीत निकमांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून पराभव झाला होता. भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती.

कॉँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला होता. यानंतर त्यांनी पुन्हा आपले कामकाज सुरू केले होते. महाराष्ट्रामध्ये खळबळ माजवून देणाऱ्या बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर ते ती केस लढणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

याच संदर्भात साम टीव्हीशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, राज्यसभेवर खासदार म्हणून खासदार म्हणून निवड झाल्यामुळे मी संतोष देशमुख प्रकरणावर विशेष सरकारी वकील म्हणून काम करू शकतो की नाही यावर अभ्यास करेन. मी कायदेतज्ञासोबत बोलणार आहे असे उज्ज्वल निकम म्हणाले.

जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्यासह माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांची देखील राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या नियुक्तीनंतर वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधत या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले आहेत. तसेच आता राष्ट्रपती नियुक्त सदस्य असल्यामुळे माझ्यावर ही मोठी जबाबदारी असणार आहे, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles