अहिल्यानगर-जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर पुण्याहून विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त व्ही. एल. मुळीक यांच्या बदलीचे आदेश ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे या महिन्यांत सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी पुण्याहून विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त (विकास) मुळीक यांची बदलीचे आदेश मंगळवारी ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आली आहेत.
दरम्यान मूळचे नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रहिवासी असणारे लांगोरे हे गेल्या तीन वर्षापासून नगर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. स्मितभाषी आणि शांत स्वभावाचे असणारे लांगोरे यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे काम गतीमान करण्यासाठी प्रयत्न केले. येत्या 31 तारखेला लांगोरे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.


