Wild Life गुजरातच्या गिर नॅशनल पार्कमध्ये सफारीवर गेलेल्या पर्यटकांच्या जिपसमोरच सिंहाने एका गायीची शिकार केली. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, पर्यटक शांतपणे सफारीचा आनंद घेत आहेत. दरम्यान, एक सिंहिण हळूवारपणे पर्यटकांच्या जिपचा आडोसा घेत, पुढे सरकत आहे. समोरून गाय येत आहे. गाय टप्प्यात आल्यानंतर, दबा धरून बसलेली सिंहिण एकदम पूर्ण वेगाने समोर असलेल्या गायीवर झडप घालते. हा हल्ला एवढा वेगात होता की, गायीला सावरण्याची संधीच मिळाली नाही. सिंहिणीने गायीची मान पकडून तिला खाली पाडले. तेवढ्यात दुसऱ्या सिंहानेही गायीवर झडप घातली.
https://x.com/DeshGujarat/status/2054117899804315714?s=20
गिर हे आशियाई सिंहांचे जगातील एकमेव नैसर्गिक निवासस्थान आहे.
ही संपूर्ण घटना काही क्षणांत घडली. हे संपूर्ण दृष्य पाहून जिपमधील पर्यटकही सुन्न झाले. ही शिकार अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात रॅकॉर्ड केली. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध स्वरुपाच्या प्रतिक्रियाही येत आहेत.


