नगर कल्याण रोडवर महिलेवर प्राणघातक हल्ला; कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल

कल्याण रोडवर कौटुंबिक वादातून प्राणघातक हल्ला; कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल
​अहिल्यानगर – ​शहरातील कल्याण रोड परिसरातील व्यंकटेश कॉलनी, शिवाजीनगर येथे कौटुंबिक वादातून एका महिलेच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून तिला गंभीर जखमी करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रिक्षाचालक रविंद्र दिलीप पवार यांच्या कुटुंबात हा वाद झाला होता. आरोपी महादेव दिलीप पवार याने जुन्या कारणावरून वाद घालत लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या पत्नीच्या डोक्यात जोरदार वार केले. यामध्ये संबंधित महिला गंभीर जखमी झाली. आरोपीने यावेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली.
​जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी येथील पॅसिफिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर फिर्यादी रविंद्र पवार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली​ त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी महादेव पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा प्रयत्न, मारहाण व दमदाटीचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंखे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles