Wednesday, March 4, 2026

अहिल्यानगरमध्ये खळबळ …..महाविद्यालयीन तरुणीसमोर तरुणाची आत्महत्या

श्रीगोंदा -शहरातील शिवाजीनगर परिसरात काल दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीसमोरच एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीकडे संबंधित तरुण काल दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आला होता. दोघांमध्ये काही वेळ संभाषण झाल्यानंतर अचानक या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समोर आले. ही घटना तरुणीच्या समोरच घडल्यामुळे ती घाबरून गेली असून परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तरुणाला तात्काळ उपचारासाठी श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून प्रेमसंबंध की इतर कोणते कारण याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र अधिकृत माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकवर्गानेही चिंता व्यक्त केली आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles