Thursday, February 19, 2026

अजित पवारांच्या बायोपिकमध्ये अभिनेता कोण? अजितदादांनी दिलं होतं उत्तर Video

अजित पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अजित पवार यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यापैकी एक व्हिडिओ म्हणजे त्यांच्या बायोपिकबद्दलचा. या व्हिडिओमध्ये अजित पवार त्यांच्या बायोपिकबद्दल बोलतात. तसेच त्यांची भूमिका कुणी करावी याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ झी गौरव चित्र पुरस्कार 2024 चा आहे. या व्हिडिओमध्ये अवधूत गुप्ते अजित पवार यांना विचारतो की, द अजित पवार नावाचा बायोपिक आला तर त्यात कोणत्या अभिनेत्याने तुमची भूमिका साकारावी? असा प्रश्न अजित पवार यांना विचारतो. यावर उत्तर देत अजित पवार म्हणतात की, निलेश साबळे यांनी करावं. त्यावर निलेश साबळे म्हणतो की, मी किती चांगला करायचो हे माहिती नाही पण हे लोकांना आवडायचं. पण मला माहित नव्हतं की, दादा स्वत:बघतात. पण, आता मला कळलं आहे त्यामुळे आता जरा जास्तच जपून करायला पाहिजे. यावर अजित पवार म्हणतात की, मी पण कधी कधी ते काय बोलतात ते बघत असतो. आम्ही पण आरशासमोर प्रॅक्टिस करत बोलत नसतो. आम्ही एकदा माईक हातात आल्यानंतर जे विचार पटतात त्या पद्धतीने बोलत असतो. परंतु निलेश साबळे यांनी बऱ्याचदा या ठिकाणी, या ठिकाणी म्हणत माझी नक्कल केली. तेव्हापासून मी ठरवलं की, हा शब्द जेवढा कमीत कमी वेळा वापरता येईल तेवढा कमी वापरायचा. त्यामुळे डॉक्टर तुम्ही अधून मधून माझी अशी नक्कल करत चला आणि मग त्याातून मलाही कळेल आपलं काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे.

अजित पवारांच्या श्रद्धांजलीचे बॅनर कर्जतमधून काढले, रोहित पवार संतापले; म्हणाले,

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles