Ahilyanagar…मंडळ अधिकाऱ्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी तरुण रंगेहाथ अटकेत

संगमनेर-तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाका परिसरात असलेल्या एका हॉटेलवर मंडळ अधिकाऱ्यासाठी (सर्कल) पाच हजार रुपयांची लाच स्वीकारता़ंना सोमवारी दुपारी एका खासगी तरुणाला अटक करण्यात आली असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांनी दिली.

नितीन किसन खर्डे (वय २९ वर्षे,रा. मु.पो. चंदनापुरी-झोळे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून रात्री उशिरा तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हा जेसीबी मशीनने शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे सपाटी करणाचे काम करतात.

दि.८ जून रोजी खाजगी व्यक्ती नितीन खर्डे यांने तक्रारदर यांना तलाठी कार्यालयात बोलावुन घेतले. त्यावेळी तेथे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदर कामकाजाबाबत बोलणे केले. त्यानंतर तक्रारदार तलाठी कार्यालयाबाहेर जात असताना, खासगी इसम नितीन खर्डे यांनी तक्रारदर यांचेकडून शेत जमिनीच्या सपाटी करणाचे काम करण्यासाठी मंडळ अधिकारी यांचे करिता पाच हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल करील अशी धमकी लाचेची मागणी केली. यानंतर तकारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तकार केली. सदर तक्रारीची दखल घेत दि.१९ जून रोजी पडताळणी केली असता, खाजगी इसम नितीन खर्डे यांनी तक्रारदार यांचेकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन ते स्विकारण्याचे मान्य केले.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हिवरगाव पावसा टोल नाका परिसरात सोमवारी (दि.२२) दुपारी सापळा रचला खाजगी इसम नितीन खर्डे यांला तक्रारदाराकडून ५ हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. नितीन खर्डे याला ताब्यात घेण्यात आले रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या कारवाईत पथकात पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी पोहवा. संदिप वनवे, पो.कॉ. प्रमोद पाळदे, लाच लुचपत प्रतिबंध विभाग नाशिक सहभागी झाले होते‌.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles