नगरमध्ये पशुसंवर्धन विभागाकडून 5 दिवसीय भव्य पशु प्रदर्शन
सर्वात छोटी गाय व म्हैस, 7 फेब्रुवारी रोजी भव्य डॉग शो
नगर : अहिल्यानगर येथील केडगाव रोडवरील नेमाणे इस्टेट मैदानावर दि.5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान कृषी पर्व कृषी महोत्सवात पशुसंवर्धन विभागाचे यावर्षी पशुप्रदर्शन आयोजित केले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली पशु प्रदर्शन होत आहे. पशु प्रदर्शनात राज्यातील विविध जातींच्या गोवंश, म्हशी, शेळ्या, विविध पक्षी प्रदर्शनात भाग घेणार आहेत. यावर्षी गिनीस बुक मध्ये नोंद झालेली सातारा येथील सर्वात छोटी अडीच फूट उंचीची म्हैस तसेच अडीच फुट उंचीची गाय हे प्रमुख आकर्षण असणार आहेत. याबरोबरच जातिवंत देवणी, डांगी, खिलार, लाल कंधारी, पुंगणुर, गिर, साहिवाल, अशा विविध जातींच्या गाई तसेच जाफराबादी व मुर्रा म्हैस तसेच उस्मानाबादी जमुनापारी बीटल बोअर अशा जातींच्या शेळ्या या प्रदर्शनात पाच दिवस भाग घेणार आहेत. महोत्सवात शनिवार दि.7 फेब्रुवारी रोजी डॉग शो होणार आहे. शहरातील विविध ब्रिडचे जातिवंत श्वान यात पहायला मिळतील.
नगरमध्ये पशुसंवर्धन विभागाकडून 5 दिवसीय भव्य पशु प्रदर्शन ; 7 फेब्रुवारी रोजी भव्य डॉग शो
- Advertisement -


