भोंदू अशोक खरात विरुद्ध आतापर्यंत ६ गुन्हे दाखल. आणखी कुणाला माहिती अगर तक्रार द्यायची असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन. विशेष तपास पथकाच्या प्रमुख आयपीएस तेजस्वी सातपुते यांनी संपर्क क्रमांक केले जाहीर.
स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळ, बलात्कार आणि महिलांचे शोषण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करायचा. महिलांना वासनेचं शिकार करण्यासाठी खरात वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधायचा. कोणाला शुद्धीकरण, शांती आणि समृद्धीसाठी विधी करायला लावायचा तर कोणाला लग्नाचं आमिष देऊन त्यांचे लैंगिक शोषण करायचा.
अशोक खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केले असल्याचं सांगितलं जात आहे. खरातला अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या दररोज नवे गुन्हे दाखल केले जात आहेत. दाखल झालेल्या गुन्ह्यातून अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आज आणखी २ गुन्हे दाखल झालेत. असे एकूण खरातवर ५ गुन्हे दाखल झाले आहेत. लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
दरम्यान अजून कोणी पीडित असतील त्यांनी पोलिसांनी जाहीर केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. बऱ्याच वेळा समाजात आपली बदनामी होईल म्हणून अनेक महिलांना तक्रार नोंदवत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. अधिक महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहनदेखील पोलिसांकडून करण्यात येत आहे. पीडित महिलांनी हेल्पलाईन क्रमांक – 9503270224 / 7775816389 वर संपर्क करत आपली तक्रार दाखल करावी.
एका विवाहित महिलेने अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी खरातला अटक केली. अनेक राजकीय नेत्यांशी हितसंबंध असलेल्या खरातला अटक केली. रविवारी आणखी दोन महिलांनी खरातविरोधात तक्रार दाखल केली. यातील एका घटस्फोटित महिलेची तक्रार तर दुसरी २०२३ मधील एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेची आहे. आतापर्यंत खरातविरुद्ध ५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.


