Ahilyanagar….विधानपरिषद परिषदेसाठी 9 जणांनी नेले 16 उमेदवारी अर्ज

अहिल्यानगर -विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी काल 9 इच्छुकांनी 16 उमेदवारी अर्ज नेले. दरम्यान, पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. गेल्या चार वर्षापासून रिक्त असणार्‍या नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार (25 मे) पासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी नऊ इच्छुकांनी 16 उमेदवारी अर्ज नेले आहेत.

अर्ज नेणार्‍या इच्छुकांची नावे, कंसात अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे : भाऊसाहेब शिंदे, रा. गुंडेगाव, ता. अहिल्यानगर (1), सुधीर वैरागर, रा. घोडेगाव, ता. नेवासा (1), कमलेश हस्तीमल गांधी, रा. शेवगाव (2), आशिष रमेश शेलार, रा. सावेडी, अहिल्यानगर (4), संतोष एकनाथ चोळके, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी (2), प्रीती सत्यजित कदम, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी (2), मनीषा सूर्यकांत कदम, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी (2), शिवाजी दत्तात्रय शिंदे, रा. अरणगाव, ता. अहिल्यानगर (1), प्रवीण सुभाष दळवी, रा. कानूर पठार ता. पारनेर (1).

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles