जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले -शैलेश मोरे ,९९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले
कॅफो शैलेश मोरे; सोसायटीची ९९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न
अहिल्यानगर – गेल्या ९९ वर्षांची उत्कृष्ट परंपरा असलेल्या अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचा कारभार आणि संस्थेकडून सभासदांसाठी राबविले जाणारे उपक्रम सहकारी संस्थांसाठी पथदर्शक असून या संस्थेने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवत त्यांना खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात संस्थेच्या २ इमारती उभ्या राहिल्या आहेत. ही महत्वाची बाब असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे यांनी केले.
अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि. ७) नगर मधील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते अविनाश भारती, जिल्हा साथरोग व हिवताप अधिकारी डॉ. नारायण वायभासे हे उपस्थित होते. प्रारंभी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सन्मान चिन्ह व रोख बक्षिसे देवून करण्यात आला.
यावेळी व्याख्याते अविनाश भारती यांनी विविध उदाहरणे देत मुलांवर खरे संस्कार कुटुंबातच होतात, त्यामुळे उद्याचे चांगले नागरिक घडविण्यासाठी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, मात्र आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नये. मुलांनीही ध्येय निश्चित करून पुढील वाटचाल करावी, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द आवश्यक आहे. असे ते म्हणाले.

सभेचे प्रास्ताविक चेअरमन संजय कडूस यांनी करत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सभेच्या विषय पत्रिकेवर चर्चेला सुरुवात झाल्या नंतर सर्व उपस्थित सभासदांना बोलण्याची संधी देत त्यांचे म्हणणे ऐकून घेत जो पर्यंत त्यांच्या शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा संचालक मंडळाने घडवून आणली.

या सभेत संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार पोटनियम दुरुस्ती, सभासद कर्ज मर्यादा २२ लाखापर्यंत वाढविणे, विवाहभेट योजनेची रक्कम ५ हजारांवरून ११ हजार रुपये करणे, नवीन बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये करावयाच्या विद्युत यंत्रणा व फर्निचर खर्चास मान्यता देणे, संस्थेच्या सुधारित आदर्शउपविधीला मान्यता देणे यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
यावेळी सभासद विकास साळुंके, अभय गट, विजय कोरडे, संभाजी आव्हाड, राजू जरे, प्रवीण राऊत, शिवहरी दराडे, निलेश गाडेकर, कैलास भडके, राजू म्हस्के, शशिकांत रासकर, विलास वाघ, गणेश पवार, एकनाथ पालवे, आदिनाथ मोरे, दिपक गोधडे, प्रमोद झरेकर,भरत घुगे, यांनी चर्चेत सहभाग घेतला. सभासदांच्या प्रश्नांना चेअरमन संजय कडूस, व्यवस्थापक राजेंद्र पवार आदींनी उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
सभेस व्हाईस चेअरमन अर्जुन मंडलिक, संचालक विलास शेळके, अरुण जोर्वेकर, प्रशांत मोरे, विक्रम ससे, चंदकांत संसारे, इंजी. राजू दिघे, भाऊसाहेब चांदणे, कल्याण मुटकुळे, डॉ. दिलीप डांगे ,ऋषीकेश बनकर, स्वप्नील शिंदे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, श्रीमती ज्योती पवार, श्रीमती सुरेखा महारनुर, श्रीमती मनिषा साळवे, अभिजित पवार, चेतन चव्हाण, उप व्यवस्थापक प्रशांत लोखंडे व कर्मचारी वृंद तसेच जिल्हाभरातून आलेले सभासद उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles