‘30 लाखाचे 60 लाख करून देतो’चे आमिष; शेवगाव पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या नगर तालुक्यातील आरोपीला अटक

शेवगाव ‘30 लाख रुपये द्या, त्याचे 60 लाख रुपये करून देतो’, असे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या आरोपीला शेवगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. प्रशांत उर्फ राम मधुकर बोठे (रा. वाळकी, ता. नगर, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रोहीदास बप्पासाहेब पारे (वय 27, रा. पाथरवाला बु., ता. गेवराई, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लोकांना त्यांच्या रकमेच्या दुप्पट नोटा छापून देण्याचे आमिष दाखवत असे. मोठी रक्कम घेऊन आलेल्या व्यक्तींना नोटा छापण्याच्या बहाण्याने विश्वासात घेऊन गोंधळ निर्माण करायचा आणि संधी साधून त्यांची रक्कम घेऊन पसार व्हायचा, अशी त्याची कार्यपद्धती होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. दरम्यान, तो अहिल्यानगर शहरातून दौंड रोड मार्गे जाणार असल्याची गोपनीय माहिती शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दौंड रोड परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने चारचाकी वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. आरोपीला 5 जून रोजी अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, चंद्रकांत कुसारे, संपत खेडकर, श्याम गुंजाळ, भगवान सानप, राहुल आठरे, ईश्वर बेरड, राजू बडे, सचिन पिरगळ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे नितीन शिंदे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करीत आहेत. दरम्यान, आरोपीकडून अशाच प्रकारे इतर कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी शेवगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles