Friday, February 20, 2026

जीएस महानगर बँक गीतांजली शेळके यांच्या सर्व १८ जागांवर दणदणीत विजय,सासू सूनाच्या लढाईत सुनेच्या पॅनेलचा विजय

जीएस महानगर बँकेची सत्ता एकहाती खेचून आणण्यात गीतांजली उदयराव शेळके यांना यश आले. त्यांच्या नेतृत्वाखालील मंडळाचे सर्वच्या सर्व उमेदवार एकूण मतदानाच्या 80 टक्के मिळवून विजयी झाले. विरोधी सुमनताई शेळके यांच्या मंडळाचा सभासदांना धुव्वा उडवला आणि गीतांजली शेळके यांच्या मंडळावर मतांचा वर्षाव करत त्यांच्या ताब्यात बँक दिली. 18 जागांवर दणदणीत विजय मिळवताना गीतांजली शेळके यांच्या मंडळाची एक जागा आधीच बिनविरोध निवडून आली होती. गीतांजली शेळके यांच्यावर सभासदांनी मोठा विश्वास व्यक्त केल्याचेच यातून स्पष्ट झाले असून या एकतर्फी विजयाच्या त्याच शिल्पकार असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

विजयी उमेदवार
* सर्वसाधारण मतदारसंघ- गीतांजली उदयराव शेळके, आडसूळ सचिन सीताराम, ढोले रविंद्र दत्तात्रय, गुंजाळ गणेश सावकार, कवाद भास्कर बाबाजी, खणकर सतीश अनंत, खोसे कुंदा भास्कर, खोसे मंगेश नारायण, कोठावळे श्रीधर कोंडीराम, लंके बबन भाऊ, पठारे संतोष किसन, शिंदे शंकर पांडुरंग, शिंदे पांडुरंग विष्णू, थोरात मंगलदास भाऊसाहेब. * महिला राखीव- गीतांजली उदयराव शेळके, वाढवणे छाया रामदास. * इतर मागास- थोरात भिवाजी भागुजी. * भटक्या विमुक्त जाती- जमाती- पालवे विलास दगडू. * अनुसुचित जाती- जमाती- संतोष भाऊराव रणदिवे (बिनविरोध).

विजयी पॅनलच्या प्रमुख असणाऱ्या गीतांजली शेळके यांनी दोन मतदारसंघातून उमेदवारी कायम ठेवली होती. सर्वसाधारण मतदारसंघात त्यांना सर्वाधिक मते मिळाली असताना दुसरीकडे त्यांनी महिला राखीव मतदारसंघात सासूबाई असणाऱ्या सुमनताई आणि ननंद असणाऱ्या स्मीता यांच्या विरोधातही उमेदवारी ठेवली होती. या मतदारसंघात देखील गीतांजली शेळके यांना सर्वाधिक मते मिळाली. दोन्ही मतदारसंघातून त्यांनी विजयी मिळवला. बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या निवडणुकीत असे पहिल्यांदाच घडले असून हा विक्रम आता गीतांजली यांच्या नावावर नोंदवला गेला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles