Saturday, February 21, 2026

Gold- Price: सोनं पुन्हा महागलं! प्रति तोळा किती पैसे मोजावे लागणार? वाचा आजचे दर

सोन्याचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहेत. आजही सोन्याचे दर वाढले आहे. सोन्याची चकाकी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे खरेदीदारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सोन्याचे भाव ११० रुपये प्रतितोळा वाढले आहे. आज १ तोळा सोन्याचे दर ९९,१७० रुपये आहेत. या भावात ११ रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७९,३३६ रुपये आहे. तर १०० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत १,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ९,९१,७०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याच्याही दरात वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर १०० रुपयांनी वाढले आहे. १ तोळा सोन्याची किंमत ९०,९०० रुपये आहे. तर ८ग्रॅम सोन्याचे दर ७२,७२० रुपये झाले आहेत.या दरात ८० रुपयांनी वाढ झाली आहे.१८ कॅरेट सोन्याचे दर ७४,३८० रुपये प्रति तोळा आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ५९,५०४ रुपये आहे. सोन्याचे दर दोन दिवसांपूर्वी ४०० रुपयांनी वाढले आहे. आज हे दर साधारणपणे १०० रुपयांनी वाढले आहेत.

आज चांदीच्याही दरात वाढ झाली आहे. १० ग्रॅम चांदी १०२० रुपयांना विकली जात आहे. १०० ग्रॅम चांदीच्या दरात १९० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर १०,२०० रुपये झाले आहेत.चांदीचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर होते.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles