आदिशक्ती अभियानासाठी होणार विशेष ग्रामसभा, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

अहिल्यानगर-राज्यातील प्रत्येक गावात 2025-26 वर्षामध्ये आदिशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यात हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी 16 ते 20 जूनदरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्त्व जाणून घेणे व महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनपणे निवारण करणे, कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी सक्षम समाजनिर्मिती, लिंगभेदात्मक विचार सरणीला आव्हान देऊन किशोरवयीन मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढवून बालविवाहमुक्त समाजाचे निर्माण, लैंगिक, शारिरीक अत्याचाराला प्रतिबंध करुन हिंसाचारमुक्त कुटूंब व समाज निर्माण करुन अनिष्ट रूढींचे निर्मूलन करणे, महिला नेतृत्वाला सक्षम करत पंचायत राज पद्धतीचे महिलांचा सहभाग वाढविणे, महिला, किशोरी यांना शिक्षण, रोजगार निर्णय व हक्क यामध्ये समान संधी निर्माण करुन शाासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगाराच्या संधीच्या माध्यमातून आर्थिक उन्नत स्त्री संकल्पना राबविण्याच्या उद्देशाने आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे.

ग्रामसभेमध्ये महिला बचत गटातील सदस्य व महिला ग्रामसंघाच्या पदाधिकार्‍यांनी या ग्रामसभेमध्ये हिरिरीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे.

गाव पातळीवरील आदिशक्ती समिती
गाव पातळीवर नव्याने तयार करण्यात येणार्‍या आदिशक्ती समित्यावर ग्रामसभेने निवडलेली महिला प्रतिनिधी या समितीच्या अध्यक्ष म्हणून राहणार आहेत. या समितीत पुरूष प्रतिनिधी (महिला व बाल विकास क्षेत्रात सक्रिय), पुरुष प्रतिनिधी सामाजिक क्षेत्रात सक्रिय, आशा स्वयंसेविका, महिला शिक्षीका, महिला तलाठी, महिला पोलिस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, संबंधीत गावाचा पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका यांचा या समितीत समावेश राहणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles