सोने खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आज (२३ जून २०२६) सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर १४६० रुपयांनी स्वस्त झाले असून चांदीची किंमत तब्बल ६१२० रुपयांनी घसरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि देशांतर्गत परिस्थितीमुळे मौल्यवान धातूंच्या किमती सातत्याने कोसळताना पाहायला मिळत आहे. २ आठवड्यांपूर्वी १,६०,००० रुपयांवर असलेला सोन्याचा भाव आता १,५०,००० रुपयांच्याही खाली आला आहे.
इंडियन बुलियन वेबसाईटनुसार, देशातील सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम सोन्याची किंमत १४७,०५० रुपये इतकी आहे. सोन्याची किमतीत आज १४६० रुपयांनी घसरल आहे. जानेवारी २०२६ मध्ये याच सोन्याने १,८०,००० रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्ध केला होता. म्हणजे आज उच्चांकापासून सोने ३२,००० रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.
जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला चांदीने ४,०४,५०० रुपये प्रति किलोची विक्रमी किंमत नोंदवली होती. मात्र, मागील ४ महिन्यात चांदीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. युद्धजन्य परिस्थितीत आणि औद्योगित मागणीतीन अनिश्चितता यामुळे चंदेरी धातूच्या किमती जवळपास निम्म्याने खाली आल्या आहे. आज चांदी ६१२० रुपयांनी घसरुन प्रति किलो २,२९,४९० रुपयांवर स्थिरावली आहे.


