जामखेड शहरात वीजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू आठ दिवसांतील तीसरा मृत्यू, महावितरणचा हलगर्जीपणा
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड – क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेक्स च्या लोखंडी पाईप ने काढत असताना घरावरील मुख्य विज वाहीनीचा शॉक लागुन 12 वर्षीय मुलाचा जाग्यावरच मृत्यू झाला. ही घटना शहरातील खर्डाचौका जवळील टेकाळे नगर या ठिकाणी घडली. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरताचं सर्वत्र हळ हळ व्यक्त करण्यात आली .विजेच्या तारांना चिकटून आठ दिवसांतील तिसरी घटना आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड शहरातील खर्डा चौकातील टेकाळे नगर या ठिकाणी सोमवार दि 30 जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्रणव प्रशांत टेकाळे, वय 12, वर्षे हा आपल्या मित्रांनसोबत घराजवळ क्रीकेट खेळत होता. प्रणव टेकाळे याच्या घराजवळुनच मुख्य विद्युत वाहीनीची लाईन गेली आहे. क्रिकेट खेळत असताना बॉल स्लॅपवरती गेला या जवळच मुख्य विजेच्या तारा होत्या. प्रणव याने फ्लेक्स चा लोखंडी पाईप सदरचा बॉल काढण्यासाठी घेतला व बॉल काढत असताना त्याच्या हातातील पाईपचा या लाईटच्या तारांना धक्का लागला व त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला.
यावेळी त्याठिकाणी असलेल्या नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र पुर्वीच त्याचा मृत्यू झाला. मागिल आठ दिवसापूर्वीच जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बाप- लेकाचा शेतातील खाली पडलेल्या विजेच्या तारांना चिकटून जाग्यावरच मृत्यू झाला होता. विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे ग्रामस्थांन कडुन बोलले जात होते. यानंतर खर्डा- बाळगव्हाण येथील महीला वायरमन यांना दोषी ठरवुन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची जामखेड तालुक्यातील येत्या आठ दिवसातील ही तिसरी घटना आहे. तरी महावितरण अधिकारी कर्मचारी झोपेचे सोंग घेत आहे . असे अधिकारी कर्मचारी तातडीने निलंबीत केले पाहिजे अशा जनतेतून संतप्त प्रतिक्रिया येत आहे . झोपी गेलेले महावितरण अधिकाऱ्यांना जाग येणार का ? अशा प्रश्न पडला आहे .
*आठवड्यात तीसरा बळी*
*सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी लक्ष देण्याची गरज* : *जामखेडकर*
जामखेड – जामखेड शहरातील खर्डा रोडवरील टेकाळे नगर येथे एका बारा वर्षाच्या मुलाचा शहरातील मुख्य वीज वाहिनी च्या तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यु झाला. यामुळे शहरात शोककळा पसरली आहे. याच आठवड्यात तालुक्यातील बाळगव्हान येथे शेतात काम करताना बाप लेकांचा मृत्यू झाला होता. आठवड्याच्या आतच तीसरा बळी गेला आहे. झोपी गेलेल्या महावितरणला जागे करण्याची सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे . अशा प्रतिक्रिया महावितरण विषयी जामखेडच्या जनतेच्या तीव्र भावना व्यक्त होत आहे.
*चौकट*
*महावितरण अनभिज्ञ*
शहरातील सदाफुले वस्ती येथील टेकाळे नगर येथे विजेचा तारेला स्पर्श होऊन बालकाचा मृत्यू झाला हि घटना संपूर्ण शहरात पसरली पण महावितरणच्या अधिकाऱ्यांना काहीही माहिती नव्हते. घटनेनंतर कोणीही महावितरणचे अधिकारी घटनास्थळी आले नव्हते. यावरूनचं महावितरणाचा हलगर्जीपणा दिसून येतो .


