onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -02-07–2026 एकुण कांदा गोणी -1,26,658
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 2100 ते 2500
2.नंबर= 1400 ते 2100
3 नंबर= 700 ते 1400
4 नंबर= 300 ते 700
————————————————————————————————————————————————–
श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी
श्रीरामपूर -शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी मगर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत.
या घटनेमुळे पूर्णवाद नगर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली असून संशयितांचा शोध सुरू आहे. जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत असून, गोळीबारामागील कारण आणि संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली आहेत. अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून, तपासानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.


