वारकरी सेवेची 28 वर्षांची परंपरा… नगर तालुक्यातील संतोष म्हस्के परिवार
आषाढ महिना सुरु होताच राज्यातील वारकऱ्यांना वेध लागतात पंढरपुरला जावून विठूमाउलीच्या चरणी नतमस्तक होण्याचे. पायी पालखी काढून लाखो वारकरी उन, पाऊस याची पर्वा न करता पांडुरंगाच्या पंढरीत चालत मार्गक्रमण करतात. अहिल्यानगर शहरामार्गे सोलापूर रोडने दरवर्षी शेकडो पायी पालख्या जात असतात. या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक जण पुढे येतात. यात सोलापूर रोडवरील वाळूंज येंथिल म्हस्के परिवार 28 वर्षांपासून वारकऱ्यांमध्येच पांडुरंग पाहून त्यांची सेवा करण्यात रममाण होतो
.
28 वर्षांपूर्वी रामदास म्हस्के व सत्यभामा म्हस्के या दाम्पत्याने वारकरी सेवेची परंपरा सुरु केली. पूर्वी अतिशय भक्तीमय वातारणात एक दिंडी कोणाकडे तरी यायची म्हटले तर आजूबाजे शेजारी, पाजारी दिवाळीसारखेच एकत्र येत. सर्व जण आमटी भाकरीचा प्र्रसाद घेवून नंतर भक्तीरसात न्हाहून निघायचे. प्रत्येक घरातून दहा ते वीस भाकरी यायच्या. दिंडी पुन्हा मार्गस्थ होईपर्यंत भाविक थांबून राहायचे. काळ बदलत गेला, पुढे घरोघरी दिंडी भेट देवू लागली. दातृत्व करणारांची संख्या वाढली. नगर – सोलापूर रोड तर पंधरा दिवस विठ्ठल भक्तीमय होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत भजने, भक्तीगीते कानावर पडतात. पुढे रामसत्य लॉन झाल्यापासून गेली 10 वर्षे भाविकांसाठी मंगल कार्यालय खुले असते. भाविकांची निवास व्यवस्था, टॉयलेट, बाथरुम, पाणी उपलब्ध करून दिले जाते. ज्यांची जेवणाची सोय होत नाही अशा दिंडीतील भाविकांना आमटी , भाकर ठेचा, बुंदी, भात असे जेवण दिले जाते. त्याचप्रमाणे वारकऱ्यांसाठी टेबल खुर्चीची व्यवस्था करून त्यांना प्रेमाने जेवण देण्याचे काम मार्केट कमिटीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक तसेच भाजपचे मा.जिल्हा सरचिटणीस संतोष म्हस्के व त्यांचा संपूर्ण परिवार भक्तीभावाने पंधरा दिवस वारकऱ्यांची अविरत सेवा करतात.
दिंडीचे स्वागत करण्यापासून व जेवण वाढण्यापर्यंत तसेच ज्या दानशूर व्यक्तींना जेवण द्यायचे पण निवारा नाही अशा व्यक्तींनाही मंगल कार्यालय मोफत उपलब्ध करून देण्याची अशी सेवाही म्हस्के परिवार करतो. दिंडीत दिवसभरात प्रवचन, किर्तनाने परिसर दुमदुमुन जातो. रामदास म्हस्के व सत्यभामा म्हस्के यांनी सुरु केलेली वारकरी सेवेची परंपरा अगदी चोख नियोजन करून संतोष म्हस्के यांच्या परिवारातील राजूशेठ म्हस्के, विकासशेठ म्हस्के, आदित्य म्हस्के, आशुतोष म्हस्के, शंतनु म्हस्के, हर्षवर्धन म्हस्के, विपुल म्हस्के, अर्चनाताई म्हस्के, अश्विनीताई म्हस्के, अरूणाताई म्हस्के,प्रतिभा म्हस्के व परिवाराने पुढे चालवली आहे. यातून लाखमोलाचे आशीर्वाद म्हस्के परिवाराला निश्चितच मिळत आहेत.


