Friday, March 13, 2026

अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेत भरती प्रक्रिया; विरोधक आक्रमक

जिल्ह्यातील अकरा हजार सभासदांचा लाभांश दोन टक्क्याने कमी करून शिक्षक बँक सत्ताधाऱ्यांनी काय मिळवले ?
– डॉ.संजय कळमकर, राज्य संपर्कनेते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

अहिल्यानगर : शिक्षक संघाच्या नेतृत्वावर विश्वास असलेले मागील चेअरमन बाळासाहेब सरोदे, व्हाईस चेअरमन रमेश गोरे तसेच तत्कालीन सत्ताधारी संचालकांनी शिक्षक बँकेचा कारभार चांगला केल्यामुळे सभासदांना कायम ठेवीवर ७ % व्याज मिळाले आणि बँकेला नफा देखील चांगला सन्मानजनक झाला… तरतुदींपेक्षा कमी खर्च करून सभासदांच्या भागभांडवलावर सभासदांना सात टक्क्यापर्यंत लाभांश देणे शक्य होते, परंतु केवळ तात्कालीन चेअरमन बाळासाहेब सरोदे व व्हाईस चेअरमन रमेश गोरे यांच्या कार्यकाळातील नफा वाटणी असल्यामुळे सत्तेवर आल्यानंतर सध्याच्या तथाकथित नेतृत्वाने आपल्या नेहमीच्या स्वभाव आणि सवयीप्रमाणे इतर अनावश्यक तरतुदीत वाढ करून सभासदांना 5% लाभांश देण्याचा निर्णय सध्याच्या घेतला… परंतु यामुळे जिल्ह्यातील अकरा हजार सभासदांचा लाभांश दोन टक्क्याने कमी करून विद्यमान सत्ताधाऱ्यांनी काय मिळवले? हा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कनेते डॉ.संजय कळमकर आणि अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी शिक्षक बँक सत्ताधारी यांना विचारला आहे…

शिक्षक बँक व विकास मंडळ यांच्या दि.20 रोजी नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूभीवर अहिल्यानगर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

ह्यावेळी पत्रकार परिषदेसाठी सर्वश्री सुरेश निवडूंगे, अविनाश निंभोरे, राजेंद्र ठाणगे, चांगदेव ढेपले, सुदर्शन शिंदे, राजू राहाणे, बाळासाहेब सालके, नानासाहेब बडाख, आर.पी. राहाणे, सुनील बनोटे, दत्तात्रय गमे, किसनराव खेमनर, राजू मुंगसे, विजय अकोलकर, संजय शिंदे, शरद कोतकर, भास्कर नरसाळे, रघुनाथ झावरे, संतोष अकोलकर, नारायण राऊत, नितीन काकडे, बाळासाहेब मुखेकर, बाबासाहेब पवार, कैलास चिंधे, आर.टी.साबळे, विठ्ठलराव फुंदे, मिलिंद तनपुरे, राजूभाई इनामदार, सुभाष गरुड, मनोहर वहाडणे, राजेंद्र थोरात, रणजीत सुद्रिक, गणपत सहाणे, सुनील नरसाळे, राम वाकचौरे, बाळासाहेब बांबळे, अशोक ढोले, भारत गवळी, सुरेश खेडकर, श्रीकृष्ण खेडकर, मधुकर रसाळ, विनोद देशमुख, अशोक बचाटे, अशोक गिरी, भाऊ ढोकरे, दिनकर सागर, गोकुळ कहाणे, संजय नळे, अल्ताफ शाह, नारायण लहाणे, अशोक कानडे, ज्ञानेश्वर सैंदाणे, ना.चि..शिंदे, कल्याण पोटभरे, अशोक आगळे, शंकर गाडे
कर, विठ्ठल वराळे, राजकुमार इथापे, बाळासाहेब रोहोकले, तसेच श्रीम जयश्री झरेकर, श्रीम संगीता कुरकुटे, श्रीम अंजलीताई मुळे, सौ मंजुषाताई पवार, सौ. सिमाताई निकम, श्रीमती स्वाती झावरे आदी मान्यवर संघ पदाधिकारी यांनी उपस्थित राहून आपली मते मांडली.

डॉ.संजय कळमकर म्हणाले की सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे डिसेंबर 23 ते फेब्रुवारी 24 या कालावधीत ठेवीवर श्री चोपडे सर चेअरमन असताना ठेवीवरचे व्याजदर ०८.१० व ०८.६० दिले… कर्ज वाटपाला बँकेत पैसे नव्हते म्हणून जवळजवळ 295 कोटी ठेवी नुतानिकृत तसेच जमा केल्यामुळे बँकेला सन २०२४२५ या आर्थिक वर्षात ठेविला दिलेले व्याज १०३.७१ कोटी व कर्जातून मिळालेले व्याज 91.31 कोटी म्हणजे जवळजवळ १२ कोटी ४० लाख रुपये ज्यादा व्याज द्यावे लागले म्हणून नफा कमी झाला हीच तूट अगोदरच्या वर्षात ०३.१० लाख रुपये होती… तरी बाळासाहेब सरोदे, रमेश गोरे व संचालकांनी काटकसर करून तरतुदीपेक्षा २ कोटी 31 लाख खर्च कमी करून इतर गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्यामुळे आपण जवळजवळ ७ कोटी रुपये नफा मिळवू शकलो व सभासदांना त्यांच्या कायम ठेवीवर ७ टक्क्यांनी व्याज देऊ शकलो व बँक आपल्या ताब्यात असती तर नक्कीच आजचा लाभांश देखील 7 % दिला गेला असता… यामध्ये सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी गरज नसताना तरतुदी मार्चअखेर नंतर तरतुदींमध्ये २ कोटी ५० लाख रुपये अतिरिक्त तरतूद टाकण्याचा निर्णय घेतला… यामध्ये धर्मदाय निधी सारख्या निधीमध्ये रक्कम खर्ची घालण्यात आली आहे व मागील कालावधीतील कारभार चांगला नाही हे अहवालात कुठेही सध्याचे सत्ताधारी यांना दाखविता आलेले नाही. मात्र जमाखर्चामध्ये खर्चाच्या सर्व तरतुदी करूनही नंतर नफ्यातून २ कोटी 50 लाख रुपये कशासाठी काढले तर सर्व सभासदांना लाभांश कमी करण्याचे पाप या मंडळींनी केलेले आहे…

शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे म्हणाले की, ह्या मंडळींनी दोन वर्षांपूर्वी सुद्धा विकास मंडळात सत्ता हाती आल्यावर संस्थेच्या खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक असताना देखील विकास मंडळाच्या सभासदांना 8.५०% व्याज अपेक्षित असताना व्याज म्हणून केवळ ४ टक्के रक्कम दिली होती, ज्यामुळे विकास मंडळासारख्या चांगल्या संस्थेची नवीन येऊ शकणाऱ्या ठेवीदारांमध्ये पत कमी करण्याचे पाप ह्या प्रवृत्तींनी केले… यामागील यांचा दुष्ट हेतू हाच होता की केवळ रावसाहेब रोहोकले गुरुजी यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे.. त्याप्रमाणे यावेळी देखील शिक्षक बँकेत 5 टक्के दराने लाभांश देऊन बाळासाहेब सरोदे व श्री रमेश गोरे यांना बदनाम करणे, एवढ्या एकाच हेतूने यांनी सभासदांची २ टक्क्याने लूट केलेली आहे… आजचा विचार केला तर 1 टक्का लाभांश अतिरिक्त देण्यासाठी 86 लाख रुपये लागतात. ०७ टक्के लाभांश(डिव्हिडंड) देण्यासाठी 86 x7 =०६ कोटी ०२ लाख रुपये लागतात… ही रक्कम नफ्यातून शिल्लक असताना देखील अतिरिक्त तरतूद दाखवून ह्या प्रवृत्तींनी ०५ टक्के दराने सभासदांना लाभांश(डिव्हिडंड) जाहीर केला आहे. म्हणजेच प्रत्येक सभासदाचा जवळजवळ दोन ते तीन हजार रुपयांचा तोटा या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे हे सर्व निषेधार्ह आहे…

शिक्षक बँक माजी चेअरमन आणि अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अविनाश निंभोरे म्हणाले की, मुळात बँकेची व विकास मंडळाची मागील निवडणूक झाल्यानंतर संचालक मंडळामध्ये बेबनाव का झाला ? संचालकांनी निवडून आल्यानंतर तथाकथित नेतृत्वाविरोधात उठाव का केला ? याचे आत्मचिंतन करण्याऐवजी नेहमीप्रमाणे दुसऱ्यांना नावे ठेऊन स्वतः कसे साव आहोत ! हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न सत्ताधारी कंपू करीत आहे… जिल्ह्यातील सभासदांना हे चांगले ज्ञात आहे की, सुरेश निवडूंगे आणि राजकुमार साळवे सर यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ संचालकांमध्ये व नेत्यांमध्ये झालेल्या उठावाला एकमेव कारण म्हणजे मी म्हणेल तसेच सर्व झाले पाहिजे, मी म्हणेल तशीच बँक चालली पाहिजे, मी म्हणेल तसेच संचालकांनी ऐकले पाहिजे व जो मला विरोध करील त्याला प्रसंगी संचालकांना मारहाण करेपर्यंतचे प्रकार जिल्ह्यातील सभासदांनी पाहिलेले आहेत…

शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी रमेश(आर.टी.)साबळे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने तात्कालीन चेअरमन बाळासाहेब सरोदे व व्हाईस चेअरमन रमेश गोरे तसेच सर्व संचालक यांच्या संघ प्रवेशाच्या वेळेस जाहीर केले होते की, शिक्षक संघ शिक्षक बँकेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही व ते तत्व संघाच्या सर्व प्रमुखांनी व शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी पाळले… खोटे बोल पण रेटून बोल…” या पद्धतीने सध्याचा बँकेचा व विकास मंडळाचा कारभार चालू आहे. विकास मंडळ गाळेधारकांना नियमानुकूल करणे व विकास मंडळ संकुल बांधकाम करणे या विषयात आम्ही देखील सकारात्मक आहोत… दोन-तीन वर्षात सत्तेत आल्यानंतर स्वतःच्या हिमतीवर विकास मंडळात एक वीट देखील ठेवू न शकणाऱ्या आणि स्वत्तः नेतृत्वाची तसेच सत्ताधारी बँक संचालक विकास मंडळ विश्वस्त तसेच सत्ताधारी कार्यकर्त्यांची एक नव्या रुपयाचीही ठेव नसताना सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सभेच्या तोंडावर फक्त बातम्या देऊन विकास मंडळ गाळेधारकांना बाहेर काढणार अश्या मनोरंजक आणि हास्यास्पद वल्गना सुरू केलेल्या आहेत…

शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी रमेश(आर.टी.)साबळे म्हणाले की, बँक मुख्यालयातील तळ मजल्यावरील पोस्टऑफिस काढणे त्याचप्रमाणे राहता शाखेला मंजुरीबाबत भंपक सत्ताधाऱ्यांनी वर्तमानपत्रात दिल्या, प्रत्यक्षात मात्र पोस्टऑफिसही निघाले नाही व राहता शाखा झालेली नाही… ही वस्तुस्थिती असताना आता नव्याने अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील सभासदांची दिशाभूल विद्यमान सत्ताधाऱ्यांनी सुरू केली असून राजूर येथे नव्याने शाखा काढू अशा प्रकारचे बनावट आश्वासन देत आहेत…

शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व शिक्षक संघ उच्चाधिकार समितीचे जिल्हा नेते सुनील बनोटे म्हणाले की, बँक ऑनलाइन करण्यासाठी एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये हाय-फाय कार्यक्रम घेऊन लाखो रुपये खर्च करण्यात आले… परंतु अद्याप देखील शिक्षक बँक ऑनलाइन झालेलीच नाही… आणि विशेष म्हणजे शिक्षक बँक ऑनलाईन करण्यासाठी आवश्यक असणारे संगणक पुणे मुंबई अथवा नगर येथून खरेदी करण्यापेक्षा गूढरीत्या आपल्या जिल्ह्यातील पाथर्डी येथे खरेदी करण्यात आले आहेत.. अर्थात यामागील खरे इंगीत देखील सभासदांना आता ज्ञात झालेले आहे…

शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व राष्ट्रीय कार्यकारिणी प्रातिनिधी राजेंद्र ठाणगे म्हणाले की, ज्यांनी वेळोवेळी सांगितले की अहवालामध्ये कोणतेही प्रकारचे फोटो छापले जाणार नाही त्यांनी मात्र “गजनी” होऊन यावेळी अहवाल छापताना स्वतःचे आणि आपल्या टेबलवरील बगलबच्च्यांचे डबल डबल फोटो छापून बँकेचा अहवाल म्हणजे एखाद्या लग्नाचा अल्बम केला आहे…. शिक्षक बँक निवडणूक कालखंडामध्ये सभासदांना 7 % ने कर्ज वितरण करणार असा शब्द सभासदांना देणाऱ्या सत्ताधाऱ्यानी आता तरी सभासदांना कर्जावरील व्याजदर कमी करावा व तशा प्रकारची घोषणा सर्वसाधारण सभेत करावी अशी मागणी आम्ही सत्ताधाऱ्यांकडून करत आहोत….

शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन व राज्य कार्यकारिणी प्रातिनिधी नानासाहेब बडाख म्हणाले की, मागील वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विद्यमान सत्ताधारी नेत्यांनी मोठ्या आवाजात सांगितले होते की कर्मचारी भरतीची बँकेला आवश्यकता नाही व स्टॉपिंग पॅटर्न देखील बदलण्याची आवश्यकता नाही… मग यावर्षीचा असा कोणता बदल झाला आहे की भरती करण्याची गरज आहे व त्यातून पॅटर्न देखील बदलण्याची गरज आहे… मागील वर्षाचा विचार केला असता जवळजवळ 67 लाख रुपये कर्मचाऱ्यांवरील खर्चात बाळासाहेब सरोदे, रमेश गोरे आणि संचालकांनी काटकसर केलेली आहे.. सध्याच्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन बँकेची प्रगती व कर्मचारी खर्चावर निर्बंध याबाबत निर्णय घेणे अपेक्षित असताना नव्याने जोडीला आलेल्या स्टाफिंग पॅटर्नतज्ञ नेत्याच्या सल्ल्याने आणि तांत्रिक कारण पुढे करून शिक्षक बँकेत जम्बो कर्मचारी भरती करावीच लागेल, असे आता सत्ताधारी म्हणत आहेत व प्रत्येकाला शब्द देत आहेत…
जिल्ह्यातील सर्व सुज्ञ सभासदांनी शिक्षक बँक प्रगतीपथावर नेण्यासाठी व विकास मंडळ संकुलाचे बांधकाम करण्यासाठी सकारात्मक राहावे. ह्याबाबत बँकेत सत्ता कोणाची आहे-नाही ह्या गोष्टीला महत्त्व नाही.. परंतु शिक्षक बँक ही या जिल्ह्यातील सर्व ११००० सभासदांची कामधेनू आहे…. शिक्षक बँक आणि विकास मंडळ ही कोणाचीही खाजगी प्रॉपर्टी नव्हे… परंतु अलीकडच्या काळामध्ये हुकूमशाही व एकाधिकारशाही प्रवृत्तीमुळे बँकेची वाटचाल ही भविष्यात खाजगी प्रॉपर्टीकडे जाते की काय असा प्रश्न जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांच्या मनामध्ये निर्माण होत आहे, अशी माहिती शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आली.

सिक्युरीटी गार्ड एजन्सी करार फार मोठे गौडबंगाल असून शिक्षक बँकेच्या प्रत्येक शाखेला तीन सिक्युरीटी गार्ड नेमणूक करणेबाबत जाहिरातीमध्ये आणि एजन्सी करारामध्ये तरतूद आहे, पण करारातील तरतुदींचा भंग करून प्रत्त्येक शाखेला तोंडी आदेशाने प्रत्यक्ष दोनच रखवालदार सध्या काम करीत आहेत… म्हणजेच सर्व तालुक्यांच्या शाखांना १४ रखवालदार बोगस दाखविण्यात आलेले आहेत… एका रखवालदाराला शिक्षक बँक महिन्याला ९,८००/- रुपये पगार देते तर सर्व शाखांचे एका महिन्याचे ९,८०० x १४ = १,३७,२०० रुपये होतात आणि. वर्षाचा हिशोब केला तर सर्व शाखांचे वर्षभराचे १२ महिन्याचे १,३७,२०० x १२ = १६,४६,४०० रुपये होतात…. म्हणजे १४ रखवालदार कामावर न येता पगार कोणाला दिला जातो याची सभासदांनीच खात्री करावी ही सर्वसामान्य सभासदांना विनंती आहे…. म्हणजेच मागील 8-9 वर्षांत ०१ कोटी 48 लाख 17 हजार रुपये सिक्युरीटी गार्ड एजन्सी करारामध्ये गफला करून कोणाला मिळाले असतील याची आता सभासदांनीच खात्री करावी…
श्री सुरेश निवडूंगे, जिल्हाध्यक्ष, संघप्रणित मंडळ, अहिल्यानगर

मागील वर्षी आमच्याबरोबर स्टाफिंग पॅटर्नला विरोध करणारे आज मात्र आरबीआयचा बागुलबुवा पुढे करून शिक्षक बँकेमध्ये नवीन कर्मचारी भरती करावी लागेल व त्यासाठी स्टाफिंग पॅटर्न बदलावा लागेल, असे सांगत आहेत… ऑनलाइन बँकेत कर्मचारी संख्या कमीत कमी असावी जेणेकरून सभासदांच्या पैशांची बचत होईल हे पाहणे आवश्यक असताना, त्यापेक्षा कर्मचारी भरती कशी करता येईल याभोवती सध्या शिक्षक बँकेचे सत्ताकारण फिरत आहे… प्रत्येकाला तुझा मुलगा, नातेवाईक बँकेत घेतो या एकाच आश्वासनावर संचालकांना व कार्यकर्त्यांना स्वतः मागे झुलवले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे… त्याचप्रमाणे गेली दोन वर्षांपूर्वी आणलेला राज्य कार्यक्षेत्राचा विषय पुन्हा एकदा नव्याने या वार्षिक अहवालामध्ये पोटनियम दुरुस्तीसाठी टाकण्यात आलेला आहे… वास्तविक पाहता त्याच वेळेस जिल्ह्यातील सभासदांनी या विषयाला विरोध केलेला आहे… आणि त्यामुळेच त्यावेळी सत्ताधाऱ्यांना तो राज्य कार्यक्षेत्राचा विषय स्वतःहून पाठीमागे घ्यावा लागला होता… मग पुन्हा नव्याने राज्य कार्यक्षेत्राचा विषय पोटनियम दुरुस्तीसाठी का घ्यावा लागला? याचे कारण देताना शेड्युल्ड बँक करायची आहे अशी बतावणी केली जात आहे… परंतु सभासदांना राज्यकार्य क्षेत्र हा विषय मान्यच नाही मग हा अट्टाहास कशासाठी हे मात्र न उलगडणारे कोडे आहे….
श्री राजकुमार साळवे, जिल्हाध्यक्ष, उच्चाधिकार समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

विकास मंडळ संकुल बांधकाम व्हावे, ही जिल्ह्यातील सर्व संघटना व सर्व मंडळे यांची प्रामाणिक भूमिका आहे…. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये यासाठी सर्व संघटनांची एक बैठक विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलावलेली होती… त्यावेळी देखील सभासदांच्या संमतीने विकास मंडळाकडे ठेवी वर्ग करण्यास सकारात्मकता असताना जाणीवपूर्वक ठेवी वर्ग करण्यामध्ये खोडा कोणी घातला, हे सर्व सभासदांना माहित आहे…. सरसकट सर्व ११००० सभासदांना कापावे त्यासाठी नवीन ठराव मान्य करा आणि पहिल्या टप्प्यात माझ्या ताब्यात 5.५० कोटी दिले तरच बांधकाम होईल हे कोणता नेता म्हणाला असावा ह्याचा शोध सभासदांनी घ्यावा. मी म्हणेल तसेच व मी म्हणेल तेच ही प्रवृत्ती जोपर्यंत डोक्यावर बसलेली आहे, तोपर्यंत विकास मंडळाची हीच अवस्था राहणार दिसत आहे… गेली अडीच तीन वर्षांमध्ये विकास मंडळामध्ये नव्याने एक वीट देखील खरेदी करू न शकणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी विकास मंडळाच्या बाबतीत आधी स्वतः सकारात्मक व्हावे. प्रथम सर्व विश्वस्तांनी प्रत्येकी एक लाख रुपये विकास मंडळाच्या बांधकामासाठी द्यावेत व विकास मंडळाच्या बांधकामासाठी सर्व संघटना व सर्व मंडळे यांची एक संयुक्त बांधकाम समिती तयार करावी व सामुहिक प्रयत्नातून हे बांधकाम करावे ही भूमिका सर्वांची आहे. परंतु बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वानुसार जर चुकीच्या सल्ल्याने विकास मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विश्वस्त कोणताही चुकीचा निर्णय घेणार असतील तर भविष्यात त्यांना आम्ही कोर्टात घेतल्याशिवाय राहणार नाही… कारण विकास मंडळाची जागा ही कोणा एकट्याची नसून ती या जिल्ह्यातील अकरा हजार सभासदांच्या मालकीची जागा आहे… हे विद्यमान विश्वस्त आणि त्यांच्या डोक्यावर बसलेल्या तुघलकी प्रवृत्तींनी लक्षात ठेवावे…
– श्री राजू राहाणे, माजी चेअरमन, शिक्षक बँक व नाशिक विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

शिक्षक बँकेचे कार्यक्षेत्र राज्य कार्यक्षेत्र करण्याचे उद्दिष्ट काय आहे हे मात्र समजत नाही… सातत्याने आठ-नऊ वर्षापासून हा विषय आणून इतर बाबींपासून सभासदांचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक हा विषय पत्रिकेवर आणला जातो… आपली शिक्षक बँक ही जिल्हा कार्य्क्षेत्रच राहावा हि जिल्हाभरातील सर्व सभासदांची इच्छा आहे. राज्य कार्यक्षेत्र कशासाठी हवे आहे? ही शिक्षक बँक आपल्या नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचीच कामधेनू आहे व ती प्राथमिक शिक्षकांचीच काम देणार आहे व तिच्यावर आपल्या जिल्ह्याचेच वर्चस्व असायला हवे… भले मग सत्ता कुणाचीही असो कोणत्याही परिस्थितीत राज्य कार्यक्षेत्र या दुरुस्तीला जिल्ह्यातील सर्व सभासदांचा नेहमीच विरोध राहील याची नोंद सत्ताधाऱ्यांनी घ्यावी….
– श्री रघुनाथ झावरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघ

शिक्षक बँकेला नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी(MD) नेमणूक हे गूढ असून अभ्यासू आणि कार्यक्षम आहेत असा मासिक सभा ठराव करून सध्याच्या सत्तेतील कंपूने तत्कालीन एमडींना दोन वर्षाची मुदतवाढ दिली होती.. परंतु आपल्याला मनमानी कारभार करून देणार नाहीत म्हणून तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी(MD) यांचा राजीनामा घेतला गेला…आता आपल्या शिक्षक बँकेतील नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोणाचे जवळचे नातेवाईक आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न सभासदांनी करावा. नवीन नेमणूक कशी झाली व मनमानी कशाप्रकारे असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नवीन एमडी ची नेमणूक…दिनांक 27 मे २०२५ या दिवशी एमडी पदासाठी विद्यमान एमडी यांचा अर्ज प्राप्त झाला, एवढ्या मोठ्या बँकेसाठी जिल्हा, राज्य नव्हेतर देशभरातून एकही अर्ज आला नाही की दाखविला नाही हे गूढ आहे.. दिनांक 27 मे २०२५ ला अर्ज आल्यानंतर दि.29 मे २०२५ला चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची कमिटी नेमून लगेच दि.01 जून२०२५ला मुलाखत घेऊन(की दाखवून) तात्काळ रुजू होण्याचे आदेश देऊन दर महिन्याला तब्बल एक लाख रुपये मानधनावर नवीन एमडी ची नियुक्ती करण्यात आली…. म्हणजेच ही सगळी प्रक्रिया एका आठवड्यामध्ये उरकविण्यात आली… या प्रक्रियेबद्दल प्रोसिडिंगची मागणी समविचारी शिक्षक बँक संचालकांनी केली असता ते प्रोसिडिंगची प्रत अद्याप अखेरपर्यंत शिक्षक बँक संचालकांना सुद्धा देण्यात आलेले नाही, हे विशेष आहे…..
– श्री किसन खेमनर, माजी चेअरमन, शिक्षक बँक व राज्य कार्यकारिणी प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

नवीन एटीएम कार्डस सुरू करण्याच्या बाबतीतल्या सर्व प्रक्रिया या गत 31 मार्च २०२५ला पूर्ण झालेले असून सर्व एटीएम कार्ड माहे एप्रिल 2025 मध्ये बँकेच्या मुख्य कार्यालयात आलेले सुध्दा आहेत व ते शाखांमध्ये वितरित करण्यासाठी पाठविण्यात येणार होते… परंतु सत्ता बदल झाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता त्या चार महिने धूळ खात ठेवलेल्या एटीएम कार्ड वितरणाचा आधीच्या सॉफ्टवेअर सारखा मोठा आलिशान कार्यक्रम घेण्याचा विचार सत्ताधाऱ्यांचा दिसत आहे… कारण कोणत्या ना कोणत्या मार्गातून पैसा कमावणे हा ह्या प्रवृत्तींचा दुष्ट हेतू नेहमीच लपून राहिलेला नाही… नवीन एटीएम कार्ड मे महिन्यातच वाटप करण्यात कोणतीही अडचण नव्हती, परंतु केवळ राजकारण म्हणून सभासदांची गैरसोय केली जात आहे. हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे…
– श्री बाळासाहेब मुखेकर, माजी व्हाईस चेअरमन, शिक्षक बँक व राज्य कार्यकारिणी प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

शिक्षक बँक ऑनलाईन करण्याबाबत वल्गना करणाऱ्यां ह्या प्रवृत्तींनी १० महिन्यापूर्वी घाईघाईने फक्त सॉफ्टवेअर खरेदीसाठी व त्यातून अतिरिक्त पैसा कमावण्यासाठी मोठा कार्यक्रम एका आलिशान हॉटेलमध्ये शिक्षक बँकेच्या खर्चातून घेऊन कसलीही तयारी न करता सॉफ्टवेअर खरेदी केले होते… त्यासाठी आवश्यक असणारे संपूर्ण डाटा त्या खात्यांना स्विच अशा अनेक किचकट प्रक्रिया असतात ज्या कंपनीचे सॉफ्टवेअर घेतले ते कोल्हापूर शिक्षक बँकेत ही आहे त्यांना देखील ते सॉफ्टवेअर चालू करण्यासाठी पूर्ण एक वर्ष लागले होते, ही वस्तुस्थिती असताना आपणच घेतलेले सॉफ्टवेअर हे कशा प्रकारचे आणि दर्जाचे आहे ह्याचे आत्मचिंतन विद्यमान सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी करणे आवश्यक आहे…सध्या शिक्षक बँक सॉफ्टवेअरबाबत सर्वसामान्य सभासद आणि बँक कर्मचारी यांच्या प्रतिक्रिया ह्याबाबत खूपच बोलक्या आणि आरसा दाखवणाऱ्या आहेत…
– श्री बाळासाहेब सालके, राज्य कार्यकारिणी प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles