जामखेड तालुक्यात 10 वर्षा पूर्वी केलेला सभामंडप कोसळला,ग्रामपंचायतने केलेल्या सर्व कामांची चौकशीची मागणी

10 वर्षा पूर्वी केलेला सभामंडप कोसळला ग्रामपंचायतने केलेल्या सर्व कामांची चौकशी करा – स्वप्नील खाडे

मौजे आनंदवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील ग्रामपंचायत आनंदवाडी येथील १० वर्षापुर्वी बांधलेला सभामंडप काल दिनांक ३० जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारे ३.०० वा. कोसळला व भुईसपाट झाला. या सभामंडपात गावातील नागरीक व लहान मुले-मुली खेळत असतात. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही.

जर काही वर्षातच केलेले काम कोसळते यावरुन असे जाणवते की, या सभामंडपाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असुन या केलेल्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. तसेच ग्रामपंचायतीने केलेले विकास कामे त्यातील अंगणवाडी शाळा ही अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शाळा देखिल या सभामंडपासारखी कोसळून लहान मुलांचा जीव धोक्यात आहे. व मोठी हानी होन्याची शक्यता आहे.

व तसेच ग्रामपंचायतने अशा ठिकाणी स्मशानभूमी केलेली आहे की, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्यास अग्नी देण्यासाठी तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही व तेही काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.

तसेच जलजिवन पाणी योजनेचा आलेला संपुर्ण निधीखर्च होऊन नागरीकांच्या कोणाच्याही घरापर्यंत पाणी आलेले नाही. त्यामुळे जलजिवन अंतर्गत आलेल्या निधीचा व सर्व कामांची चौकशी करण्यात यावी.
व तसेच ग्रामपंचायतने केलेलं कामे माहितीच्या अधिकाराने जर पाहिले तर काही कामे केवळ कागदोपत्री झालेले आहे. व या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुध्द योग्य ती कायदेशिर कारवाई करावी, ही विनंती.
आनंदवाडी ग्रामपंचायत यांनी आत्तापर्यंत केलेल्या सर्व कामाची आपण सखोल चौकशी करुन भष्ट्राचार थांबवावा व कारवाई करावी
सदरील कामांची चौकशी वेळेवर न झालयास व योग्य उत्तर न मिळाल्यास संपुर्ण आनंदवाडी येथील ग्रामस्थ आपल्या तहसिल कार्यालयासमोर येऊन आंदोलन करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे…!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles