Friday, February 20, 2026

नगर-पाथर्डी रोडवर भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

अहिल्यानगर-नगर-पाथर्डी रोडवरील बारादरी (ता. नगर) महाल फाट्याजवळ 11 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 सहा वाजता झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तुकाराम दराडे (वय 47, शेती, रा. शिंगोरी, ता. शेवगाव) यांनी कारवरील अज्ञात महिला चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये 18 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवण्यात आला.

अज्ञात महिला चालकाने भरधाव वेगाने आणि बेफिकिरीने व्हॅगनर चालवताना पल्सर मोटरसायकलला धडक दिली. अपघातात मोटरसायकलवरील तुकाराम कसाळ (वय 31, रा. आंतरवाली, ता. शेवगाव) यांचा सिव्हील हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर हरिभाऊ उर्फ हरिदास दराडे (वय 23, रा. शिंगोरी) यांचा 14 ऑगस्ट रोजी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles